ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये रोहितचं शानदार शतक

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 03, 2019 03:50 PM 2019-02-12T14:15:30+5:30

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये रोहितचं  शानदार शतक

शहर : मुंबई

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये रोहित शर्माने शानदार शतक केलं आहे. दिवसाअखेरीस भारताचा स्कोअर २०२/ असा झाला आहे. पावसामुळे दिवसभरात फक्त ५९. ओव्हरचाच खेळ झाला. रोहित शर्मा ११५ रनवर नाबाद आणि मयंक अग्रवाल ८४ रनवर नाबाद खेळत आहे. रोहित शर्मा पहिल्यांदाच टेस्टमध्ये ओपनिंगला खेळत आहे. ओपनर म्हणून टेस्ट, वनडे आणि टी-२० क्रिकेटमध्ये शतक करणारा रोहित हा एकमेव भारतीय खेळाडू बनला आहे.

रोहित शर्माचं हे टेस्ट क्रिकेटमधलं चौथं शतक आहे. रोहितची सुरुवातीची शतकं त्याच्या पहिल्या मॅचमध्येच आली होती. यानंतर तिसऱ्या शतकासाठी रोहितला वर्ष वाट पाहावी लागली. २०१३ साली रोहितने पहिली शतकं केली तर २०१७ साली रोहितला तिसरं शतक करता आलं. यानंतर वर्षांनी रोहितने चौथं शतक झळकावलं.

रोहित आणि मयंक अग्रवाल ही जोडी टेस्ट क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच ओपनिंगला आली आहे. आपल्या पहिल्याच मॅचमध्ये ओपनिंगला द्विशतकी पार्टनरशीप करण्याचा विक्रम रोहित आणि मयंकने केला आहे. पहिल्याच मॅचमध्ये ओपनिंग करताना शतकी पार्टनरशीप करणारी रोहित-मयंकची ही सातवी जोडी आहे.

भारताकडून सगळ्यात पहिले १९६९-७० साली कानपूरमध्ये वीनू मंकड आणि फारूक इंजिनियर यांनी १११ रनची पार्टनरशीप केली होती. यानंतर १२ वर्षांनी सुनील गावसकर आणि अरुण लाल यांनी हा विक्रम केला. विरेंद्र सेहवाग आणि राहुल द्रविडने पहिल्यांदाच ओपनिंग करताना ४१० रन केल्या.

वसीम जाफर आणि दिनेश कार्तिकनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १५३ रन केले. यानंतर मुरली विजय आणि शिखर धवनने २८९ रनची पार्टनरशीप केली. नुकताच टीममधून बाहेर झालेला केएल राहुलही या यादीत आहे. राहुलने पार्थिव पटेलसोबत १५२ रनची पार्टनरशीप केली होती.

मागे

India vs South africa : मयंक अग्रवालचं द्विशतक
India vs South africa : मयंक अग्रवालचं द्विशतक

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा ओपनर मयंक अग्रव....

अधिक वाचा

पुढे  

अश्विनचा विक्रम, मुरलीधरनशी बरोबरी
अश्विनचा विक्रम, मुरलीधरनशी बरोबरी

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारताचा २०३ रननी दणदणीत विज....

Read more