By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 18, 2019 01:04 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
आगामी वेस्ट इंडिज दौर्यावर जाण्यासाठी विराट आणि रोहित ला विश्रांती दिली जाणार असल्याची चर्चा होती. पण आता कर्णधार विराट कोहली आणि सलामीचा फलंदाज रोहित शर्मा यांनी या दौर्यावर जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, लवकरच भारतीय संघ विंडीज दौर्यावर जाणार आहे. भारत आणि विंडीज यांच्यात तीन एकदिवसीय सामने, तीन टी-20 सामने आणि दोन कसोटी सामने होणार आहेत. या दौर्यावर विराट कोहली आणि रोहित शर्मा महेंद्र सिंह धोनी यांना विश्रांती देण्याची चर्चा चालू होती. मात्र विराट आणि रोहित यांनी दौर्यावर जाण्याची इच्छा व्यक्त केली असल्याने नेमके कोण कोणते खेळाडू दौर्यावर जाणार आहेत. हे पाहणं उत्सुकत्याचे ठरणार आहे. दरम्यान महेंद्रसिंह धोनीला पुढील दोन महीने विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. हार्दिक पंड्या पाठीच्या दुखण्याने त्रस्त आहे. जलद गती गोलंदाज बूमराह ला विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. नवीन खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता दिसून येते. भारतीय संघाची निवड 19 जुलै रोजी केली जाणार आहे. त्यानंतरच पूर्ण चित्र स्पष्ट होईल.
विश्वचषकात सेमी फायनल मध्ये टिम इंडिया चा पराभव होताच सर्व थरातून टीका....
अधिक वाचा