ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

भारत-वेस्टइंडीज यांच्यात आज निर्णायक लढत

By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 14, 2019 04:42 PM 2019-02-12T14:15:30+5:30

भारत-वेस्टइंडीज यांच्यात आज निर्णायक लढत

शहर : मुंबई

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आज तिसरा एकदिवसीय सामना होणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला तर दुसरा भारताने जिंकला. त्यामुळे तिसरा सामना ही जिंकून मालिका जिंकण्याच्या इराद्याने टीम इंडिया आज मैदानात उतरेल. तर विंडीज संघ  मालिका एक-एक अशी बरोबरी सोडवण्याच्या निर्धाराने मैदानात उतरणार आहे.

तत्पूर्वी टी-ट्वेंटी मालिका भारताने जिंकली आहे. त्यानंतर दुसरा एकदिवसीय सामना जिंकल्याने विराट संघाचा आत्मविश्‍वास वाढला आहे. आता एक दिवसीय सामन्यांची मालिका जिंकण्याची विराट सेनेला संधी आहे. वेस्टइंडीजपेक्षा भारताची गोलंदाजी अधिक सरस आहे. भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, कुलदीप यादव यांच्या समावेशाने संघाची गोलंदाजी अधिक भक्कम बनले. सलामीचा फलंदाज शिखर धवनला अद्याप सूर गवसलेला नाही. त्याच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष आहे. विंडीजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेलचा हा मायदेशातील आणि कारकिर्दीतील अखेरच्या एकदिवसीय सामना आहे.

मागे

टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी सहा दिग्गजांमध्ये चुरस
टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी सहा दिग्गजांमध्ये चुरस

भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक पदासाठी रवी शास्त्रीसह  माईक हेसण, टॉम मु....

अधिक वाचा

पुढे  

टीम इंडियाने मालिका 2019 जिंकली
टीम इंडियाने मालिका 2019 जिंकली

वेस्ट इंडिज विरुद्धचा तिसरा एकदिवसीय सामना भारतीय संघाने सहा गडी आणि पंधरा....

Read more