By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 26, 2019 10:59 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : विदेश
आंटिगा येथील कसोटी सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने वेस्ट इंडिजचा चौथ्याच दिवसी 318 धावांनी दारुण पराभव केला. भारतीय संघाने परदेशात मिळविलेला हा सर्वात मोठा विजय आहे. सर्वाधिक कसोटी सामाने जिकण्याच्या महेंद्रसिंग धोनीच्या विक्रमाशी विराटने बरोबरी केली. धोनीने कर्णधारपदी असताना आपल्या कसोटी कारकिर्दीत 60 सामन्यांमध्ये 27 विजय मिळविले होते.
आंटिगा येथील कसोटी सामना जिंकून भारताने 2 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. भारताने विंडीज समोर 419 धावांचे मोठे आव्हान ठेवले होते. या आव्हानचा पाठलाग करताना विंडीज फलंदाजांची पुरती दमछाक झाली. भारतीय गोलंदाजानी त्याची दांनादाण उडविली. भारतीय गोलंदाज जसप्रीत बूमराहने 5, इशांत शर्माने 2 आणि मोहम्मद शमीने 2 बळी मिळविले. विंडीजचा डाव 100 धावांत आटोपला.
तत्पूर्वी टिम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य राहणे 102, हनुमा बिहारी 93 आणि विराट कोहलीने 51 धावा केल्या. भारताने दूसरा धाव 7 बाद 343 धावांवर घोषित केला. त्यामुळे टिम इंडियाला दुसर्या डावात 418 धावांची भली मोटी आघाडी घेता आली.
या सामन्याच्या विजयामुळे विराटने परदेशात सर्वाधिक कसोटी सामने जिंकण्याचा माजी कर्णधार सौरभ गांगुलीचा विक्रम मोडीत काढला. गांगुलीने परदेशात 11 कसोटी सामने जिंकले होते. आंटिगा कसोटी सामन्यात मिळालेला विजय हा विराटच्या नेतृत्वात भारताने परदेशात मिळविलेला बारावा विजय आहे.
राष्ट्रीय उतेजक चाचणी प्रयोगशाळेवर जागतिक उतेजक प्रतिबंधक संस्थेने(वाडा) 6....
अधिक वाचा