By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 12, 2021 11:32 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
क्रीडापटू असणार्यांसाठी देशसेवेसाठी एक चांगली संधी चालून आली आहे. भारतीय नौदलात क्रीडा कोट्यात विविध पदांवर भरती होत असून जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. अर्ज प्रक्रिया ऑफलाइन असून ७ मार्च २०२१ पर्यंत अर्ज करता येतील.
नौदलातील खलाशी पदांवरील या भरतीसंदर्भातल्या अधिसूचना जाहीर केली गेली आहे त्यानुसार इच्छुक आणि योग्य उमेदवार अर्ज करू शकतात. मात्र, ईशान्येतील राज्ये, जम्मू-काश्मीर, अंदमान-निकोबार, लक्षद्वीप येथे अर्ज करण्याची अंतिम तारीख १४ मार्च २०२१ आहे.
पद आणि पात्रता
नेव्ही सेलर्स स्पोर्ट्स कोटा एन्ट्री (01/2021) बॅच अधिसूचनेनुसार डायरेक्ट इंट्री पेटी ऑफिसर (डीईपीओ)
सीनियर सेकेंडरी रिक्रूट (एसएसआर)
मॅट्रिक रिक्रूट (एमआर) कॅटेगरी मध्ये नौसैनिकांची भरती
तीनही कॅटेगरी साठी पात्रता वेगवेगळी आहे.
सीनिअर सेकेंडरी रिक्रूट (MMR) - या पदांवरील भरतीसाठी उमेदवारांना कोणत्याही शाखेतून बारावी उत्तीर्ण असणे अनिवार्य. वयोमर्यादा १७- २१ वर्षे.
मॅट्रिक रिक्रूट (MR) - या पदांसाठी उमेदवारांना दहावी उतीर्ण होणे अनिवार्य. वयोमर्यादा १७ - २१ वर्षे आहे.
विशेष- उमेदवारांना खेळांमध्ये आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय किंवा राज्यस्तरावरील किंवा आंतरविद्यापीठ स्पर्धेत भाग घेतलेला असणे आवश्यक आहे.
नोटिफिकेशनसाठी येथे क्लिक करा. https://www.joinindiannavy.gov.in/files/event_attachments/Sailors_Sports_1_21_Advt.p
भारत आणि इंग्लंड यांच्यात चार सामन्यांची कसोटी मालिका सुरु होणार आहे. पहिल....
अधिक वाचा