By Dinesh Shinde | प्रकाशित: नोव्हेंबर 21, 2019 02:30 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
भारताची युवा नेमबाज मनू भाकर हिने २०१९ च्या आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेत सुवर्ण यशाला गवसणी घातली आहे. भारताच्या वतीने या स्पर्धेत सहभागी झालेल्या मनूने १० मीटर एकर पिस्तूल स्पर्धेत ही चमत्कार कामगिरी केली. अशारीतीने १० मीटर एकर पिस्तूल स्पर्धेत सुवर्णा पदक मिळवणारी हीना सिद्धू हिच्यानंतर मनू ही दुसरी भारतीय खेळाडू ठरली आहे. मनूने एकूण २४४.७ इतक्या गुणांसह कनिष्ठ गटातील विश्वविक्रमही मोडीत काडला.
भारताच्या यशस्वीनी देस्वाल हिनेसुद्धा या स्पर्धेत सहभाग घेतला होता. तिला ६ व्या स्थानावर समाधान मानवं लागलं. पुरुषांच्या १० मीटर एकर पिस्तूल स्पर्धेत ५८८ गुणांसह अभिषेक वर्मा आणि ५८१ गुणांसह सौरभ चौधरी हे अंतिम फेरीसाठी पात्र ठरले आहेत.
कोलकाता मध्ये होणाऱ्या भारत विरूद्ध बांग्लादेश दुसऱ्या कसोटी सामन्या बाब....
अधिक वाचा