ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

भारत-श्रीलंका दुसरी टी-20 लढत आज 

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 07, 2020 03:48 PM 2019-02-12T14:15:30+5:30

भारत-श्रीलंका दुसरी टी-20 लढत आज 

शहर : मुंबई

         टी-20 मालिकेतील पहिली लढत पावसात ‘वाहून’ गेल्यानंतर आज दुसरी टी- 20 लढत होळकर स्टेडियमवर होईल.  या लढतीत भारतीय संघ लंकेचा सामना करेल, त्यावेळी डावखुरा सलामीवीर शिखर धवनवरच खऱया अर्थाने दडपण असणार आहे. रोहित शर्माला विश्रांती देण्यात आल्याने धवन व केएल राहुल या मालिकेत सलामीला उतरतील. 


          पण, रोहित पुढील मालिकेत संघात परतत असताना धवन व वेगाने प्रगती करत असलेला केएल राहुल यांच्यात दुसऱया स्थानासाठी रस्सीखेच असेल. त्यामुळे, संघातील जागा टिकवण्यासाठी धवनला स्वतःला सिद्ध करावे लागणार आहे. सायंकाळी 7 वाजता या लढतीला सुरुवात होईल.


         35 वर्षीय धवनला वाढत्या वयाचा अडसर जाणवत असून त्या तुलनेत 27 वर्षीय केएल राहुल अलीकडे अधिक आक्रमक खेळताना दिसून आला आहे. यंदा टी-20 विश्वचषक स्पर्धा ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियात खेळवली जात असताना त्या स्पर्धेत कोण खेळणार, हे देखील नजीकच्या कालावधीत स्पष्ट होणार आहे. त्यामुळे देखील धवन, केएल राहुल अधिक महत्त्वाकांक्षी असणार आहेत.

 

       मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये स्ट्राईक रेटच्या निकषावर धवन खूपच खराब फॉर्ममध्ये असल्याचे जाणवते. त्यामुळे, लंकेविरुद्ध या मालिकेतील उर्वरित दोन लढतीत धवनला बरीच मेहनत घ्यावी लागू शकते. अर्थात, धवन दुखापतीतून सावरत संघात परतत असून यामुळेही त्याच्यासमोरील परिस्थिती आणखी आव्हानात्मक असेल. 2019 मध्ये धवनला 12 सामन्यात 110 च्या स्ट्राईकरेटने 272 धावा जमवता आल्या आहेत.

 

         दुसरीकडे, युवा फलंदाज केएल राहुलने मिळेल त्या प्रत्येक संधीचा पुरेपूर लाभ करुन घेत संघातील जागा भक्कम करण्यावर सर्व लक्ष केंद्रित केले आहे. विंडीजविरुद्ध 3 वनडे व 3 टी-20 सामन्यात त्याचा बहारदार फॉर्म लक्षवेधी ठरला होता. त्या मालिकेत 6 डावात त्याने एक शतक व 3 अर्धशतके झळकावली.

 

           ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱया टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर, भारतीय संघ काही प्रयोग करणार, हे साहजिक आहे. पण, तरीही अद्याप मनीष पांडे व संजू सॅमसन यांना पूर्ण आजमावून पाहण्यात आलेले नाही, ही वस्तुस्थिती आहे. गुवाहाटीतील पहिल्या सामन्यात जसप्रित बुमराहच्या पुनरागमनाची उत्सुकता होती. ती लढत न झाल्याने येथेही त्याच्यावरच चाहत्यांचे लक्ष असेल. इंदोरमध्ये निरभ्र हवामान असल्याने येथे रंगतदार लढतीची अपेक्षा आहे.

 

         होळकर स्टेडियमवर आतापर्यंत केवळ एकच टी-20 आंतरराष्ट्रीय सामना झाला असून त्यावेळीही लंका हाच प्रतिस्पर्धी संघ होता. डिसेंबर 2017 मधील त्या लढतीत रोहितने 43 चेंडूत 118 व राहुलने 49 चेंडूत 89 धावांची तडाखेबंद आतषबाजी केल्यानंतर भारताने 20 षटकातच 5 बाद 260 धावांचा डोंगर उभा केला. भारताने ती लढत 88 धावांनी जिंकली होती.

 

मॅथ्यूज परतणार का?

       लसिथ मलिंगाच्या नेतृत्वाखालील लंकेच्या सर्वात अनुभवी खेळाडूंपैकी एक असणाऱया अष्टपैलू अँजिलो मॅथ्यूजला गुवाहाटीतील सामन्यात संधी मिळाली नव्हती. त्या लढतीत लंकेनेही भारताप्रमाणेच 3 मध्यमगती व 2 फिरकीपटू खेळवण्यावर भर दिला. पण, आता दुसऱया लढतीत लंका मॅथ्यूजला संधी देणार का, हे पहावे लागेल.

संभाव्य संघ

भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, शिवम दुबे, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रित बुमराह, नवदीप सैनी, शार्दुल ठाकुर, मनीष पांडे, वॉशिंग्टन सुंदर, संजू सॅमसन.

श्रीलंका : लसिथ मलिंगा (कर्णधार), डी. गुणतिलका, ए. फर्नांडो, अँजिलो मॅथ्यूज, दसून शनाका, निरोशन डिकवेला, धनंजया डीसिल्वा, उदाना, राजपक्ष, ओ. फर्नांडो, हसरंगा, लहिरु कुमारा, कुशल मेंडिस, संदकन, के. रजिथा.

सामन्याची वेळ : सायं. 7 पासून.
 

मागे

क्रिकेटर अष्टपैलू इरफान पठाणची निवृत्ती 
क्रिकेटर अष्टपैलू इरफान पठाणची निवृत्ती 

        नवी दिल्ली - टीम इंडियाचा अष्टपैलू इरफान पठाणने आंतरराष्ट्रीय क्....

अधिक वाचा

पुढे  

६३ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा दावेदार हर्षवर्धन सद्गिर ठरला
६३ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा दावेदार हर्षवर्धन सद्गिर ठरला

          पुणे -  या वर्षी महाराष्ट्रची ६३ वी केसरी स्पर्धा पार पडली. या ....

Read more