By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 10, 2020 02:13 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
आयपीएलच्या 13 व्या (IPL 2020) मोसमातील अंतिम सामना आज (10 नोव्हेंबर) खेळवण्यात येणार आहे. हा अंतिम सामना मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात होणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. मुंबईला पाचव्यांदा तर दिल्लीला पहिल्यांदा विजेतेपद पटकावण्याची संधी आहे.
1) आयपीएलमधील यशस्वी कर्णधार रोहित शर्माने आतापर्यंत 4 वेळा मुंबई संघाला विजेतेपदाची ट्रॉफी मिळवून दिली आहे. दुसरीकडे आयपीएलच्या इतिहासात दिल्लीने पहिल्यांदाच फायनलमध्ये धडक मारली आहे. आणि ही किमया दिल्लीचा युवा कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघाने सांघिक खेळाच्या जोरावर साधली आहे.
2) साखळी फेरी संपल्यानंतर गुणतालिकेत पहिल्या स्थानावर राहिलेल्या टीमने तीनवेळा आयपीएलची ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे. यातही ऐनवेळी प्लेमध्ये पोहचल्यावर धडाकेबाज खेळी करुन मुंबईने 2 वेळा आयपीएलचं जेतेपद आपल्या नावावर केलंय.
3) आतापर्यंतच्या आयपीएल इतिहासात फायनल सामन्याचं नेतृत्व करणारा सगळ्यात युवा कर्णधार म्हणून श्रेयस अय्यरचा रेकॉर्ड असणार आहे. 2013 च्या आयपीएल मोसमात रोहितने पहिल्यांदा मुंबईचं नेतृत्व केलं. श्रेयस 25 वर्ष आणि 339 दिवसांचा असताना आज तो आयपीएल फायनलचं नेतृत्व करतोय तर दुसरीकडे रोहितने 26 वर्ष आणि 26 दिवसांचा असताना मुंबईकडून आयपीएल फायनलचं नेतृत्व केलं होतं.
4) श्रेयस अय्यर पहिला असा क्रिकेटर असणार आहे की ज्याचा जन्म मुंबईत होऊन तो आयपीएल फायनलमध्ये मुंबईविरुद्धच्या टीमचं नेतृत्व करणार आहे.
5) रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर असे पहिले खेळाडू आहेत की ज्यांनी आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये नेतृत्व करण्याआधी आयपीएलमध्ये नेतृत्व करुन आपल्या संघाला फायनलमध्ये पोहोचवलं आहे. रोहित शर्माने ही किमया 2013 मध्ये तर श्रेयसने यंदाच्या 2020 च्या मोसमात साधली आहे.
6) दिल्ली कॅपिटल्सच्या संघात माहिर खेळाडूंचा भरणार आहे. शिखर धवन, रविचंद्रन अश्विन आणि अक्षर पटेल असे खेळाडू आहेत की ज्यांनी आयपीएलच्या जेतेपदाच्या संघात आपला सहभाग नोंदवलेला आहे. शिखर धवनने 2016 च्या हैदराबाद संघात आपल्या दमदार बॅटिंगचा नजारा पेश केला होता त्यावेळी हैदराबादने जेतेपद मिळवलं होतं. 2010 मध्ये चेन्नईने तर 2013 मध्ये मुंबईने आयपीएलची ट्रॉफी आपल्या नावावर केली होती. 2010 च्या चेन्नईच्या संघात आर.अश्विन तर 2013 च्या मुंबई संघात अक्षर पटेल खेळला होता.
आयपीएलच्या 13 व्या (IPL 2020) मोसमातील अंतिम सामना (IPL 2020 Live) आज (10 नोव्हेंबर) खेळण्यात य....
अधिक वाचा