ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

IPL 2019: मुंबईविरुद्धच्या मॅचमध्ये बंगळुरूने टॉस जिंकला, बॉलिंगचा निर्णय

By GARJA ADMIN | प्रकाशित: मार्च 28, 2019 08:10 PM 2019-02-12T14:15:30+5:30

IPL 2019: मुंबईविरुद्धच्या मॅचमध्ये बंगळुरूने टॉस जिंकला, बॉलिंगचा निर्णय

शहर : मुंबई

आयपीएलमध्ये मुंबईविरुद्धच्या मॅचमध्ये बंगळुरूने टॉस जिंकला आहे. बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. मुंबईने त्यांच्या टीममध्ये दोन बदल केले आहेत. बेन कटिंगच्याऐवजी लसिथ मलिंगाला संधी देण्यात आली आहे. तर रसिक सलामच्याऐवजी लेग स्पिनर मयंक मार्कंडेची निवड झाली आहे. 

या दोन्ही टीमना या मोसमातल्या पहिल्या मॅचमध्ये पराभव पत्करावा लागला होता. या मॅचमध्ये दोन्ही टीम त्यांच्या पहिल्या विजयासह पॉईंट्स टेबलमध्ये खातं उघडण्यासाठी मैदानात उतरतील.

रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळणाऱ्या मुंबईला पहिल्या मॅचमध्ये दिल्लीकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. या मॅचमध्ये मुंबईचा स्टार बॉलर जसप्रीत बुमराहच्या खांद्याला दुखापत झाली होती. पण त्याची टीममध्ये निवड झाली आहे. तर दुसरीकडे लसिथ मलिंगाच्या पुनरागमनामुळे मुंबईला दिलासा मिळाला आहे.

दिल्लीविरुद्धच्या पहिल्या मॅचमध्ये मुंबईचा ३७ रननी पराभव झाला होता. या मॅचमध्ये मुंबईची बॉलिंग फारशी चांगली झाली नव्हती. तर बॅटिंगमध्येही युवराजचं अर्धशतक वगळता कोणत्याही बॅट्समनला चमकदार कामगिरी करता आली नाही.

दुसरीकडे बंगळुरूचा चेन्नईविरुद्धच्या पहिल्या मॅचमध्ये लाजिरवाणा पराभव झाला होता. बंगळुरूची टीम त्या मॅचमध्ये फक्त ७० रनवर ऑल आऊट झाली होती. आयपीएल इतिहासातला हा सहावा सगळ्यात कमी स्कोअर आहे.

मुंबईची टीम

रोहित शर्मा(कर्णधार), क्विंटन डीकॉक, सूर्यकुमार यादव, युवराज सिंग, कायरन पोलार्ड, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, मिचेल मॅकलॅनघन, लसिथ मलिंगा, मयंक मार्कंडे, जसप्रीत बुमराह

बंगळुरूची टीम

विराट कोहली(कर्णधार), पार्थिव पटेल, मोईन अली, एबी डिव्हिलियर्स, शिमरोन हेटमायर, शिवम दुबे, कॉलिन डिग्रॅण्डहोम, नवदीप सैनी, युझवेंद्र चहल, उमेश यादव, मोहम्मद सिराज

मागे

IPL 2019 : मुंबई इंडियन्सकडून बुमराहच्या दुखापतीबाबत अपडेट्स
IPL 2019 : मुंबई इंडियन्सकडून बुमराहच्या दुखापतीबाबत अपडेट्स

मुंबई, आयपीएल 2019 : इंडियन प्रीमिअर लीगमधील सलामीच्या सामन्यात मुंबई इं....

अधिक वाचा

पुढे  

IPL 2019: रोमहर्षक मॅचमध्ये मुंबईचा बंगळुरवर विजय
IPL 2019: रोमहर्षक मॅचमध्ये मुंबईचा बंगळुरवर विजय

रोमहर्षक मॅचमध्ये मुंबईने बंगळुरूचा पराभव केला आहे. याचबरोबर मुंबईने यंदा....

Read more