ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

आयपीएल 2019 : चेन्नई विरुद्ध मुंबई मध्ये रंगणार लढत

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 03, 2019 01:18 PM 2019-02-12T14:15:30+5:30

आयपीएल 2019 : चेन्नई विरुद्ध मुंबई मध्ये रंगणार लढत

शहर : मुंबई

गतविजेती चेन्नई विरुद्ध मुंबई टीममध्ये बुधवारी (3 एप्रिल) मॅच खेळली जाणार आहे. ही मॅच मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर खेळली जाणार आहे. या मॅचला रात्री 8 वाजता सुरुवात होणार आहे. चेन्नईची या पर्वाची सुरुवात दणक्यात झाली आहे. चेन्नईने या पर्वातील खेळलेल्या मॅच जिंकल्या आहेत. तर मुंबईने खेळलेल्या मॅचपैकी मॅचमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर एक मॅचमध्ये विजय मिळवला आहे. त्यामुळे आजच्या चेन्नई विरुद्धच्या मॅचमध्ये मुंबई विजयाच्या निर्धाराने मैदानात उतरेल. अंकतालिकेत चेन्नई गुणांसह पहिल्या तर मुंबई गुणांसह व्या क्रमांकावर आहे.

 

रेकॉ़र्ड काय सांगतो

चेन्नई आणि मुंबई या उभय टीममध्ये झालेल्या अखेरच्या मॅचपैकी मुंबईने मॅच जिंकल्या आहेत. त्यामुळे चेन्नईला मुंबई विरुद्धात खेळताना जरा सावधपणे खेळावे लागणार आहे. या दोन्ही टीम आयपीएलमध्ये एकूण 26 मॅच खेळले आहेत. त्यापैकी 14 मॅचमध्ये मुंबईने विजय मिळवला आहे.

 

मुंबईची निराशाजनक कामगिरी

मुंबईच्या टीममध्ये एकापेक्षा एक दमदार खेळाडूंचा भरणा आहे. या यादीमध्ये रोहित शर्मा, पोलार्ड, युवराज सिहं यांचा समावेश आहे. परंतू या खेळाडूंना आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. युवराज सिंहने या पर्वाच्या पहिल्या मॅचमध्ये अर्धशतकी खेळी केली. परंतू यात युवराजला सातत्य ठेवता आले नाही. मुंबईच्या बॅट्समनची निराशाजनक खेळी हे देखील मुंबईच्या पराभवाचे महत्वाचे कारण आहे. मुंबईची बॅटिंग लाईन दमदार आहे, त्या तुलनेत बॉलिंग लाईन देखील तेवढाच धमाकेदार आहे. परंतू या बॉलर्सना देखील आपल्या बॉलिंगने फारशी काही चमकदार कामगिरी करता आली नाही. पांड्या बंधूं आणि मलिंगा यांना देखील सातत्यापूर्ण कामगिरी करण्यास झगडावे लागत आहे.

 

चेन्नईचे आव्हान

मुंबईसमोर चेन्नईचे आव्हान असणार आहे. चेन्नईचा कॅप्टन महेंद्र सिंह सध्या चांगल्याच फॉर्ममध्ये आहे. धोनीने राजस्थान विरुद्ध झालेल्या मागील मॅचमध्ये 46 बॉलमध्ये 75 रन्सची तडाखेदार खेळी केली होती. त्यामुळे मुंबईच्या बॉलर्सना धोनीला रोखण्याचे आव्हान असणार आहे. चेन्नईकडे अखेरपर्यंत बॅट्समनचा भरणा आहे. तसेच त्यांच्याकडे स्पीन बॉलिंगमध्ये देखील अनेक पर्याय आहेत. चेन्नईकडे हरभजन सारखा अनुभवी फिरकीपटू आहे. यासोबतच रविंद्र जडेजा आणि इमरान ताहिर देखील चांगली कामगिरी करत आहेत. त्यामुळे या मॅचनिमित्ताने क्रिकेट चाहत्यांना चुरशीची मॅच पाहायला मिळणार आहे.

मागे

टीम इंडियाला सचिन तेंडुलकरकडून वर्ल्ड कपसाठी हटके शुभेच्छा
टीम इंडियाला सचिन तेंडुलकरकडून वर्ल्ड कपसाठी हटके शुभेच्छा

2 एप्रिल 2011 या तारखेला भारतीय क्रिकेट इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे. आठ वर्ष....

अधिक वाचा

पुढे  

क्रिकेटमध्येही होणार मिश्र टी-२० मॅच
क्रिकेटमध्येही होणार मिश्र टी-२० मॅच

टेनिस आणि बॅडमिंटनमध्ये आपण मिश्र दुहेरी सामने नेहमीच बघतो. पण फूटबॉल आणि क....

Read more