ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

चेन्नईने नाणेफेक जिंकली, दिल्लीला फलंदाजीचे आमंत्रण

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 10, 2019 07:21 PM 2019-02-12T14:15:30+5:30

चेन्नईने नाणेफेक जिंकली, दिल्लीला फलंदाजीचे आमंत्रण

शहर : visakhapatnam

आयपीएलमध्ये इतिहास घडवण्याच्या प्रयत्नात असलेल्या दिल्ली कॅपिटल्सला दुसर्या क्वालिफायर सामन्यात शुक्रवारी चेन्नई सुपर किंग्जचे आव्हान पेलावे लागणार आहे. युवा खेळाडूंचा भरणा असलेल्या दिल्लीने अनुभवी चेन्नईवर विजय मिळवला तर बारा वर्षांत दिल्लीचा संघ पहिल्यांदाच अंतिम फेरीत पोहोचेल. यापूर्वी 2011 मध्ये या संघाने ‘प्ले ऑफ’पर्यंत मजल मारली होती. 
लीगमधील दोन्ही सामन्यांत चेन्नईने दिल्लीवर मात केली होती. इतकेच नव्हे तर चेन्नईत झालेल्या सामन्यात दिल्लीचा 80 धावांनी पराभव झाल्यामुळे त्यांचा रनरेट एकदम घसरला आणि समान गुण असूनही त्यांना तिसर्या क्रमांकावर यावे लागले. त्यामुळे त्यांना ‘एलिमिनेटर’चा सामना खेळावा लागला. या सगळ्याचा वचपा काढण्याची संधी आता दिल्लीला आली आहे. परंतु, महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील सीएसकेचा मुकाबला करणे दिल्लीसाठी सोपी गोष्ट नसणार आहे. दिल्लीने या मैदानावर एक सामना खेळल्यामुळे त्यांना याचा फायदा होऊ शकतो.
दिल्लीने बुधवारी सनरायझर्सविरुद्ध रोमहर्षक विजय मिळवला. 21 चेंडूंत 49 धावा करणारा दिल्लीचा स्टार फलंदाज ऋषभ पंत या सामन्यात ‘गेम चेंजर’ ठरला; पण विजय अवाक्यात आणल्यानंतर तो बाद झाला. शेवटी संघाने विजय मिळवल्यामुळे त्याच्या बाद होण्याची फारशी चर्चा झाली नाही. परंतु, त्याने बेजाबदार फटका मारल्याने दिल्लीचे आव्हान संपुष्टात आले असते. ऋषभकडून पुन्हा एकदा वादळी खेळीची संघाला अपेक्षा असणार आहे. मात्र, त्याचसोबत  जर धावांचा पाठलाग करायची वेळ आली तर विजय मिळवूनच त्याने मैदानावरून परतावे अशीही चाहते अपेक्षा करतील. कर्णधार श्रेयस अय्यर, सलामीवीर पृथ्वी शॉ या युवा फलंदाजांसोबत अनुभवी शिखर धवन, रूदरफोर्ड, इन्ग्राम यांच्यामुळे दिल्लीची फलंदाजी बळकट भासत आहे.

मागे

पंत नवीन पिढीचा सेहवाग - संजय मांजरेकर
पंत नवीन पिढीचा सेहवाग - संजय मांजरेकर

दिल्ली कॅपिटल्स संघाचा यष्टीरक्षक ऋषभ पंत चांगल्याच फॉर्मात आहे. आपल्या धड....

अधिक वाचा

पुढे  

IPL 2019 : चेन्नईच्या फिरकीचा सामना करण्यासाठी मुंबई उतरवणार स्फोटक फलंदाज
IPL 2019 : चेन्नईच्या फिरकीचा सामना करण्यासाठी मुंबई उतरवणार स्फोटक फलंदाज

 आयपीएल 2019 : मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स ही ड्रीम फायनल ....

Read more