By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 09, 2019 01:00 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : viswanatham
163 धावांचा पाठलाग करणार्या दिल्ली कॅपिटल्सने 8 गडी राखून विजयी लक्ष्य ओलांडले. सलामीवीर पृथ्वी शॉने दोन षटकार व सहा चौकारांसह 56 धावांची आणि रिषभ पंतने पाच षटकार व दोन चौकारांसह 49 धावांची खेळी साकारत दिल्ली कॅपिटल्सचा विजय सुकर केला.
आता येत्या शुक्रवारी दिल्ली कॅपिटल्ससमोर गतविजेत्या चेन्नई सुपरकिंग्जचे आव्हान असणार आहे. या लढतीतील विजेता रविवारी जेतेपदाच्या झुंजीत मुंबई इंडियन्सचा सामना करील.
त्याआधी नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबाद संघाने 8 बाद 162 धावसंख्या उभारली. इशांत शर्माने चौथ्या षटकात वृद्धिमान साहाला (8) श्रेयस अय्यरकरवी झेलबाद करून दिल्ली कॅपिटल्सला आश्वासक सुरुवात करून दिली. दुसरा आघाडीवीर मार्टिन गप्टीलने 19 चेंडूंत एक चौकार व 4 टोलेजंग षटकारांसह 36 धावांची संक्षिप्त पण देखणी खेळी केली. अमित मिश्राने किमो पॉलकरवी झेलबाद करून हे वादळ शमविले.
मनीष पांडे (30) व कर्णधार केन विल्यम्सन (28) यांनी संथ फलंदाजी केली. किमो पॉलने पांडेला रुदरफोर्डकरवी झेलबाद केले, तर इशांत शर्माने विल्यम्सनचा त्रिफळा उडवून दिल्लीला महत्त्वाचे बळी मिळवून दिले. मग विजय शंकरने 11 चेंडूंत 2 षटकार व तितक्याच चौकारांसह 25 धावांची आक्रमक खेळी केली. ट्रेंट बोल्टने शंकरला अक्षर पटेलकरवी झेलबाद करून दिल्लीला पाचवे यश मिळवून दिले. मोहम्मद नबीनेही 13 चेंडूंत एक षटकार व तीन चौकारांसह 20 धावा केल्या. किमो पॉलने त्याला अक्षर पटेलकरवी झेलबाद केल्याने हैदराबादला पावणेदोनशेचा टप्पा गाठण्यात अपयश आले. दिल्ली कॅपिटल्सकडून किमो पॉलने 3, तर इशांत शर्माने 2 गडी बाद केले.
काही काळ गुणतालिकेत टॉपवर असलेल्या दिल्ली कॅपिटल्सला मुंबई इंडियन्सने शे....
अधिक वाचा