ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पंजाबची खराब सुरूवात; दोन गडी बाद

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 03, 2019 07:50 PM 2019-02-12T14:15:30+5:30

पंजाबची खराब सुरूवात; दोन गडी बाद

शहर : mohali

पंजाब आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आज मोहालीच्या पीसीए आयएस बिंद्रा स्टेडियमवर महत्त्वाचा सामना रंगणार आहे. आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये प्रवेश मिळवण्याच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. दोन्ही संघांनी 12 पैकी 5 सामने जिंकले आहेत. दोन्ही संघांनी 12 व्या मोसमाची सुरुवात चांगली केली, परंतु त्यांना सातत्य राखण्यात अपयश आले. पंजाबला मागील सहापैकी पाच सामन्यांत पराभव पत्करावा लागला, तर कोलकाताला सलग सहा सामने गमवावे लागले. दोन्ही संघांचे प्रत्येकी दोन सामने शिल्लक आहेत.

प्ले ऑफसाठी महत्वपूर्ण असलेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना किंग्ज इलेव्हन पंजाबची सुरुवात खराब झाली. फॉर्ममध्ये असलेला राहुल फक्त 2 धावा करुन बाद झाला. त्यानंतर ख्रिस गेलही 14 धावा करुन माघारी परतला. या दोन्ही सलामीवीरांना संदीप वारियरने पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. पंजाबला बसलेल्या या दोन तगड्या धक्यांमुळे 71 धावा करता आल्या. 

मागे

श्रीशांतने द्रविडला शिव्या घातल्या; पॅडी अपटन यांच्या आत्मचरित्रात गंभीर आरोप
श्रीशांतने द्रविडला शिव्या घातल्या; पॅडी अपटन यांच्या आत्मचरित्रात गंभीर आरोप

स्पॉट फिक्सिंग प्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या एस.श्रीशांतवर भारतीय संघा....

अधिक वाचा

पुढे  

ICC T-20 Ranking | भारताची पाचव्या स्थानी घसरण, पाकिस्तान पहिल्या क्रमांकावर
ICC T-20 Ranking | भारताची पाचव्या स्थानी घसरण, पाकिस्तान पहिल्या क्रमांकावर

आयसीसीने नुकतीच टी-२० क्रमवारी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे आयसीसीने पहिल्....

Read more