By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 03, 2019 01:18 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
सुपर ओव्हरमध्ये गेलेल्या सामन्यात मुंबईने हैदराबादचा पराभव करून मुंबई प्ले अॅपमध्ये पोहचली आहे. सुपर ओव्हरमध्ये हैदराबादने मुंबईला विजयासाठी 9 रनचं आव्हान दिलं होतं. पहिल्या 3 बॉलमध्येच मुंबईने हे आव्हान पूर्ण केलं. राशिद खानच्या पहिल्याच बॉलला हार्दिक पांड्याने सिक्स मारला. यानंतर दुसर्या बॉलला त्याने एक रन काढून पोलार्डला स्ट्राईक दिला. मग पोलार्डने तिसर्या बॉलवर दोन रन काढून मुंबईला विजय मिळवून दिला.
त्याआधी सुपर ओव्हरमध्ये बॉलिंग करताना मुंबईने जसप्रीत बुमराहकडे बॉल दिला. बुमराहच्या पहिल्याच बॉलवर मनिष पांडेने 2 रन घ्यायचा प्रयत्न केला, पण कृणाल पांड्याने त्याला रन आऊट केलं. दुसर्या बॉलला मार्टन गप्टीलने एक रन काढून मोहम्मद नबीला स्ट्राईक दिला. नबीने बुमराहच्या तिसर्या बॉलला सिक्स मारली आणि चौथ्या बॉलला तो आऊट झाला. सुपर ओव्हरमध्ये बॅटिंग टीम दोनच विकेट गमावू शकत असल्यामुळे हैदराबादला उरलेले दोन बॉल खेळायला मिळाले नाहीत.
मुंबईने ठेवलेल्या 162 रनचा पाठलाग करताना हैदराबादची सुरुवात चांगली झाली. वृद्धीमान सहा आणि मार्टिन गप्टीलने हैदराबादला 4 ओव्हरमध्येच 40 रन करून दिल्या. पण बुमराहने दोन्ही ओपनरना माघारी पाठवलं. एकीकडे हैदराबादच्या विकेट पडत असतानाच मनिष पांडे किल्ला लढवत होता. मनिष पांडेने 47 बॉलमध्ये नाबाद 71 रनची खेळी केली. मोहम्मद नबीनेही त्याला चांगली साथ दिली. नबीने 20 बॉलमध्ये 31 रन केले.
शेवटच्या ओव्हरमध्ये हैदराबादला विजयासाठी 17 रनची गरज होती, पण हार्दिक पांड्याच्या या ओव्हरमध्ये हैदराबादला 16 रनच काढता आले. शेवटच्या बॉलवर 7 रनची आवश्यकता असताना मनिष पांडेने सिक्स मारून मॅच टाय केली. मुंबईकडून जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्याला प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या.
या मॅचमध्ये मुंबईने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. क्विंटन डिकॉकच्या संघर्षमय खेळीनंतर मुंबईने हैदराबादपुढे 163 रनचं आव्हान ठेवलं. पहिले बॅटिंग करणार्या मुंबईला कर्णधार रोहित शर्माच्या रुपात पहिला धक्का लागला. 18 बॉलमध्ये 24 रन करणार्या रोहितला खलील अहमदने माघारी धाडलं. क्विंटन डिकॉकने 58 बॉलमध्ये नाबाद 69 रनची खेळी केली. यामध्ये 6 फोर आणि 2 सिक्सचा समावेश होता. संपूर्ण 20 ओव्हरपर्यंत बॅटिंग करणार्या डिकॉकला फटकेबाजी करण्यात अपयश येत होतं. हैदराबादकडून खलील अहमदने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या, तर भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद नबीला प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.
हैदराबादविरुद्धच्या या पराभवामुळे मुंबईची टीम प्ले ऑफमध्ये पोहोचली आहे. आत्तापर्यंत खेळलेल्या 13 मॅचपैकी 8 मॅचमध्ये मुंबईचा विजय आणि 5 मॅचमध्ये पराभव झाला आहे. मुंबईच्या खात्यात सध्या 16 पॉईंट्स आहेत. पॉईंट्स टेबलमध्ये मुंबई दुसर्या क्रमांकावर पोहोचली आहे.
मुंबई घरच्या मैदानावर हैदराबदला भिडणार आहे. नाणेफेक जिंकून मुंबईने फलंदाज....
अधिक वाचा