By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 07, 2019 06:56 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : chennai
स्पिनर्सना साथ देणार्या विकेटवर चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मुंबईवर टर्निंग ट्रॅकवर चेस करण्याचे प्रशर आहे. पण, रोहितने या टर्निंग ट्रॅकवर आपल्या फिरकी गोलंदाजांचा खुबीने वापर करुन चेन्नईचे फॉर्ममधील दोन फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये धाडले. सामन्याचे दुसरेच षटक टाकणार्या चहरने फाफ ड्युप्लिसिसला 6 धावांवर बाद केले. पाठोपाठ यंदाच्या आयपीएलमध्ये पहिला सामना खेळणार्या जयंत यादवने सुरेश रैनाला 5 धावांवर बाद करत चेन्नईला दुसरा धक्का दिला.
आयपीएलच्या अंतिम फेरीत जाण्यासाठी आज चुरस रंगणार आहे ती मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन मातब्बर संघांमध्ये. आतापर्यंत या दोन्ही संघानी आयपीएलमध्ये नेत्रदीपक कमगिरी केली आहे. गुणतालिकेत अखेरच्या क्षणी मुंबईने चेन्नईकडून अव्वल स्थान हिरावून घेतले होते. या गोष्टीचा बदला चेन्नई आजच्या सामन्यात घेणार की मुंबई अंतिम फेरीत पोहोचणार, याची सार्यांना उत्सुकता असेल.
हा सामना चेन्नईच्या घरच्या मैदानात होणार आहे. चेन्नईने एम. ए. चिदंबरम स्टेडियममध्ये सातपैकी सहा सामने जिंकले आहे. त्यमुळे या सामन्यात चेन्नईचे पारडे जड असल्याचे म्हटले जात आहे. चेन्नईची खेळपट्टी ही फिरकी गोलंदाजीसाठी ओळखली जाते. त्यामुळे दोन्ही संघांत किती फिरकीपटू असतील, हे पाहणेही उत्सुकतेचे असेल. चेन्नईच्या मैदानात जास्त दव पाहायला मिळते. त्यामुळे यावेळी जो संघ नाणेफेक जिंकेल, धावांचा पाठलाग करण्याला प्राधान्य देईल.
चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणारा मराठमोळा अष्टपैलू क्रिकेटपटू केदार जाधव ख....
अधिक वाचा