By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 23, 2019 04:59 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
यंदाच्या आयपीएल मोसमात मुंबईच्या टीमने त्यांच्या खेळाडूंमध्ये आणखी एक बदल केला आहे. दुखापतग्रस्त अल्झारी जोसेफऐवजी मुंबईने टीममध्ये ब्युरन हेन्ड्रीक्सला संधी दिली आहे. ब्युरन हेन्ड्रीक्स हा दक्षिण आफ्रिकेचा डावखुरा फास्ट बॉलर आहे. उरलेल्या मॅचमध्ये ब्युरन हेन्ड्रीक्स मुंबईकडून खेळेल.
राजस्थानविरुद्धच्या मुंबईत मॅचमध्ये अल्झारी जोसेफच्या खांद्याला दुखापत झाली होती. सीमारेषेवर फोर अडवताना अल्झारी जोसेफचा खांदा निखळला. या दुखापतीमुळे जोसेफ संपूर्ण मोसमाला मुकणार आहे. न्यूझीलंडचा फास्ट बॉलर ऍडम मिलने याच्याऐवजी अल्झारी जोसेफला मुंबईने संधी दिली होती. आयपीएलचा यंदाचा मोसम सुरू होण्याआधी ऍडम मिलने याने दुखापतीमुळे माघार घेतली होती. आपली पहिलीच मॅच खेळताना अल्झारी जोसेफने विक्रम केला होता. हैदराबादविरुद्धच्या मॅचमध्ये जोसेफने १२ रन देऊन ६ विकेट घेतल्या होत्या. आयपीएल इतिहासातली ही आत्तापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे.
ब्युरन हेन्ड्रीक्स हा याआधी २०१५ साली पंजाबच्या टीमकडून आयपीएल खेळला होता. आयपीएलच्या ७ मॅचमध्ये हेन्ड्रीक्सने ९ विकेट घेतल्या आहेत. तर हेन्ड्रीक्सने दक्षिण आफ्रिकेकडून २ वनडेमध्ये १ विकेट आणि १० टी-२० मॅचमध्ये १६ विकेट घेतल्या.
इंडियन प्रीमिअर लीगच्या 12व्या मोसमाचा अंतिम सामना हैदराबादच्या राजीव गांध....
अधिक वाचा