ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

IPL 2019 : राजस्थान विरुद्ध पंजाब मध्ये आज रंगणार लढत

By GARJA ADMIN | प्रकाशित: मार्च 25, 2019 07:53 PM 2019-02-12T14:15:30+5:30

IPL 2019 : राजस्थान विरुद्ध पंजाब मध्ये आज रंगणार लढत

शहर : मुंबई

आयपीएलच्या १२ मोसमाची सुरुवात झाली आहे. आज २५ मार्चला राजस्थान विरुद्ध पंजाब या टीममध्ये मॅच रंगणार आहे. या दोन्ही  टीम या पर्वातील आपली पहिली मॅच खेळणार आहेत. ही मॅच  सवाई मानसिंह स्टेडियमवर खेळण्यात येणार आहे. राजस्थान टीमच्या नेतृत्वाची धुरा ही अंजिक्य रहाणेच्या खांद्यावर आहे. गतवर्षी राजस्थानला सेमी फायनल मध्ये स्थान मिळवण्यास अपयश आले होते. त्यामुळे या मोसमात राजस्थानला विजयी सुरुवात मिळवून देण्याचा मानस कॅप्टन रहाणेचा असेल.

स्टीवन स्मिथने टीममध्ये पुनरागमन केले आहे. बॉल टेंपरिग प्रकरणामुळे गत वर्षाच्या आयपीएल मध्ये तो खेळू शकला नव्हता. राजस्थानच्या जॉस बटलर कडे सर्वांचे लक्ष असणार आहे. गेल्या आयपीएल मोसमात बटलरने १३ मॅचमध्ये तडाखेदार ५४८ रन केल्या होत्या.
राजस्थानच्या बॉलिंगची मदार धवल कुलकर्णी, जयदेव उनाडकट, जोफ्रा आर्चर यांच्या खांद्यावर असेल. तर श्रेयस गोपल आणि कृष्णप्पा गौतम या दोघांवर फिरकीची जबाबदारी असेल.

पंजाब टीमची देखील ही मॅच जिंकून चांगली सुरुवात करण्याची इच्छा असेल. पंजाबकडे तगड्या खेळाडू्ंचा भरणा आहे. यामध्ये क्रिस गेल, डेविड मिलर, केएल राहुल, मयंक अग्रवाल, करुण नायर आणि मंदीप सिंह यांचा समावेश आहे. तसेच मोइस हेनरिक्स आणि निकोलस पूरन हे दोन ऑलराउंडर टीममध्ये असल्याने गरजेच्या वेळी निर्णायक भूमिका बजावू शकतात.

पंजाब टीम कडून बॉलिंगची जबाबदारी मोहम्मद नबी, अंकित राजपूत आणि एंड्रयू टाय या वेगवान बॉलरवर असणार आहे. तर कॅप्टन आर आश्विन आणि मुजीब रहमान हे दोघे आपल्या फिरकीने विरोधी टीमला रोखण्याचे प्रयत्न करतील.      

पंजाब टीम : लोकेश राहुल, क्रिस गेल, एंड्रयू टाई, मयंक अग्रवाल, अंकित राजपूत, मुजीब उर रहमान, करुण नायर, डेविड मिलर, रविचंद्रन अश्विन (कॅप्टन), मोइसिस हेनरिक्स, निकोलस पूरन, वरुण चक्रवर्ती, सॅम कुरेन, मोहम्मद शमी, सरफराज खान, हरडस विलोजेन, अर्शदीप सिंह, दर्शन नालकंडे, प्रभसिमरन सिंह, अग्निवेश अयाची, हरप्रीत बराड आणि मुरुगन अश्विन. 

राजस्थान टीम : अजिंक्य रहाणे (कॅप्टन), कृष्णप्पा गौतम, संजू सॅमसन, श्रेयस गोपाल, आर्यमान बिडला, एस. मिधुन, प्रशांत चोपड़ा, स्टुअर्ट बिन्नी, राहुल त्रिपाठी, बेन स्टोक्स, स्टीव स्मिथ, जोस बटलर, जोफ्रा आर्चर, ईश सोढ़ी, धवल कुलकर्णी, महिपाल लोमरोर, जयदेव उनादकट, वरुण एरॉन, ओशेन थॉमस, शशांक सिंह, लियाम लिविन्स्टोन, शुभम रजने, मनन वोहरा, एश्टन टर्नर, रियाण पराग.

मागे

IPL 2019 : पंजाब-राजस्थानच्या सामन्यात स्टिव्हन स्मिथवर लक्ष
IPL 2019 : पंजाब-राजस्थानच्या सामन्यात स्टिव्हन स्मिथवर लक्ष

जयपूर, आयपीएल 2019 : यंदाच्या हंगामातील राजस्थान रॉयल्स आणि किंग्ज इल....

अधिक वाचा

पुढे  

IPL 2019 : मुंबई इंडियन्सकडून बुमराहच्या दुखापतीबाबत अपडेट्स
IPL 2019 : मुंबई इंडियन्सकडून बुमराहच्या दुखापतीबाबत अपडेट्स

मुंबई, आयपीएल 2019 : इंडियन प्रीमिअर लीगमधील सलामीच्या सामन्यात मुंबई इं....

Read more