By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 03, 2019 04:01 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
आयपीएलच्या तेराव्या हंगामाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यासाठी आठही संघ सध्या संघ बांधणीकरिता सज्ज झाले आहेत. यासाठी 19 डिसेंबर रोजी कोलकाता येथे लिलाव होणार आहे. या लिलावासाठी जगभरातील सर्वच खेळाडू इच्छूक आहेत. यासाठी 9 डिसेंबरपर्यंत खेळाडू लिलावासाठी आपली नावे नोंदवू शकतात. तर, या लिलावात पॅट कमिन्स, डेल स्टेन आणि मॅक्सवेल यांसारख्या खेळाडूंची बेस प्राईज 2 कोटी रुपये ठेवण्यात आली आहे.
आयपीएल ही जगातली सर्वात मोठी लीग असून यात दरवर्षी कोट्यावधींची उलाढाल केली जाते. मात्र यंदा रेकॉर्ड ब्रेक खेळाडूंच्या नावाची नोंद करण्यात आली आहे. आयपीएलच्या लिलावासाठी 971 खेळाडूंनी निलामीसाठी इच्छा व्यक्त केल आहे. तर, 9 डिसेंबर रोजी खेळाडूंची अंतिम यादी जाहीर होणार आहे.
याआधी आयपीएल खेळणाऱ्या आठही संघांनी काही खेळाडूंना रिटेन तर रिलीज करण्याचा निर्णय घेतला. तर, काही खेळाडूंची अदला बदलीही करण्यात आली. त्यानंतरही 971 खेळाडू आयपीएलमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छूक आहेत. बीसीसीआयनं याबाबत माहिती देताना लिलावात एकूण 73 जागा भरल्या जाणार आहेत. यात 215 खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर एकही सामना खेळलेला नाही तर, 754 खेळाडू हे पहिल्यांदा आयपीएल खेळण्यास उत्सुक आहेत.
2 कोटी बेस प्राईज असलेले खेळाडू
या यादीमध्ये 2 कोटी बेस प्राईज असलेले एकूण 7 खेळाडू आहेत. यात डेल स्टेन (दक्षिण आफ्रीका), पॅट कमिन्स (ऑस्ट्रेलिया), जॉस हेजलवुड (ऑस्ट्रेलिया), क्रिस लिन (ऑस्ट्रेलिया), मिशेल मार्श (ऑस्ट्रेलिया), ग्रेन मॅक्सवेल (ऑस्ट्रेलिया) आणि अंजेलो मॅथ्यूज (श्रीलंका) यांचे नाव आहे.
1.5 कोटी बेस प्राईज असलेले खेळाडू
तर, या लिलावात एकूण 9 खेळाडूंची बेस प्राईज ही 1.5 कोटी आहे. यात भारताचा आक्रमक फलंदाज रॉबिन उथप्पा याचे नाव आहे. याशिवाय या यादीत शॉन मार्श (ऑस्ट्रेलिया), केन रिचर्ड्सन, इयॉन मोर्गन (इंग्लंड), जेसन रॉय (इंग्लंड), क्रिस वोक्स (इंग्लंड), डेविड विली, क्रिस मॉरिस यांसारखे खेळाडू आहेत.
या दोन दिग्गज खेळाडूंनी नाव घेतले मागे
आयपीएलच्या लिलावातून माघार घेण्याचे या दोन्ही खेळाडूंचे कारण धक्कादायक आहे. मिशेल स्टार्क याने व्यस्त असल्यामुळे खेळू शकणार नसल्याचे सांगितले आहे. तर, जो रूटनं चक्क आयपीएलमध्ये खेळण्यासाठी उत्सुक नसल्याचे कारण दिले. मिशेल स्टार्कनं 2015मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून आयपीएल खेळला होत. तर, 2018मध्ये कोलकाता संघानं 9.4 कोटींना स्टार्कला विकत घेतले होते, मात्र दुखापतीमुळे त्याला खेळता आले नाही. तर, आयपीएल 2019मध्ये वर्ल्ड कपमुळे मिशेलनं खेळण्यास नकार दिला होता. दरम्यान मिशेल स्टार्क द हंड्रेड लीगमध्ये सामिल होणार असल्यामुळे तो आयपीएल खेळू शकणार नाही आहे. या संघात स्टार्क Welsh Fire संघाकडून खेळणार आहे. या संघात त्याला 1.14 कोटींना विकत घेतले होते. तर, जो रूटला 2018मध्ये लिलावात कोणत्याही संघानं विकत घेतले नव्हते त्यामुळं तो यंदाच्या लिलावात सामिल होणार नाही आहे.
IPL संघांकडची शिल्लक रक्कम
1. किंग्स इलेव्हन पंजाब, 42.70 कोटी
2. कोलकाता नाइटरायडर्स, 35.65 कोटी
3. राजस्थान रॉयल्स, 28.90 कोटी
4. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, 27.90 कोटी
5. दिल्ली कॅपिटल्स, 27.85 कोटी
6. सनराजयर्स हैदराबाद, 17.00 कोटी
7. चेन्नई सुपरकिंग्स, 14.60 कोटी
8. मुंबई इंडियन्स, 13.05 कोटी
बांगलादेशला कसोटी आणि टी-20मध्ये चारीमुंड्या चीत केल्यानंतर भारतीय संघ वेस....
अधिक वाचा