By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: ऑक्टोबर 03, 2020 07:35 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
शेवटच्या ओव्हरपर्यंत गेलेल्या सामन्यात अखेर चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) पराभव झाला आहे. सनरायजर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) चेन्नईवर 7 धावांनी मात केली आहे. यासह चेन्नईचा या पर्वातील तिसरा पराभव झाला आहे. हैदराबादने चेन्नईला विजयासाठी 165 धावांचे आव्हान दिले. मात्र चेन्नईला 20 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून 157 धावा केल्या. चेन्नईच्या विजयासाठी रवींद्र जडेजा आणि कर्णधार महेंद्रसिंह धोनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र ते अपयशी ठरले. चेन्नईकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक 50 धावा केल्या. तर कर्णधार महेंद्रसिंह धोनीने नाबाद 47 धावा केल्या. हैदराबादकडून थंगारसु नटराजनने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या.
विजयी आव्हानाचं पाठलाग करायला आलेल्या चेन्नईची निराशाजनक सुरुवात झाली. चेन्नईला अवघ्या 4 धावांवर पहिला झटका लागला. शेन वॉटसन 1 धावेवर बाद झाला. यानंतर अंबाती रायुडू आणि फॅफ डु प्लेसिसने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र रायुडू 8 धावांवर बाद झाला. त्यानंतर चेन्नईने स्वसतात विकेट गमावले.
यानंतर रवींद्र जडेजा आणि कर्णधार महेंद्रसिंह धोनीने चेन्नईचा डाव सावरला. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 72 धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली. या दरम्यान रवींद्र जडेजाने आपलं अर्धशतक पूर्ण केलं. मात्र यानंतर जडेजा 50 धावांवर बाद झाला. जडेजाने या खेळीत 2 सिक्स आणि 5 फोर लगावले.
जडेजा बाद झाल्यानंतर चेन्नईच्या आशा कर्णधार धोनीकडून होत्या. त्यानुसार धोनीने फटकेबाजी केली. धोनीने चेन्नईच्या विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र धोनीला चेन्नईला विजय मिळवून देण्यास अपयश आले. धोनीने नाबाद 47 धावा केल्या. हैदराबादकडून थंगारसु नटराजनने 2 विकेट्स घेतल्या. तर भुवनेश्वर कुमार आणि अब्दुल समदने प्रत्येकी 1 विकेट घेतली.त्याआधी हैदराबादने टॉस जिंकला. हैदराबादने टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी आलेल्या हैदराबादची खराब सुरुवात झाली. जॉन बेअरस्टो भोपळा न फोडता तंबूत परतला. यानंतर मनिष पांडे 29 धावांवर रनआऊट झाला. यानंतर 11 व्या ओव्हरच्या पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर हैदराबादने लागोपाठ 2 विकेट गमावले. त्यामुळे हैदराबादची 69-4 अशी परिस्थिती झाली.मात्र यानंतर हैदराबाद अडचणीत असताना प्रियम गर्ग आणि अभिषेक शर्मा या युवा जोडीने डाव सावरला. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी सर्वाधिक 77 धावांची भागीदारी केली. या जोडीने हैदराबादच्या डावाला आकार दिला. हैदराबादकडून प्रियम गर्ग या युवा खेळाडूने सर्वाधिक नाबाद 51 धावा केल्या. तर अभिषेक शर्माने 31 धावा केल्या. चेन्नईकडून दीपक चहरने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या.
महिला क्रिकेटर्सचा 'मिनी आयपीएल' म्हणजेच चॅलेन्जर सीरिज 4 ते 9 नोव्हेंबर द....
अधिक वाचा