ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

IPL 2020: दिल्लीचा राजस्थानवर 46 रनने विजय

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 10, 2020 10:47 AM 2019-02-12T14:15:30+5:30

IPL 2020: दिल्लीचा राजस्थानवर 46 रनने विजय

शहर : मुंबई

आयपीएलच्या 23 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटलने राजस्थान रॉयल्सचा 46 धावांनी पराभव केला. सामन्यात राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. दिल्लीने प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणतेही बदल केले नाहीत. त्याचबरोबर राजस्थानने संघात दोन बदल केले होते. अंकित राजपूत आणि टॉम कुर्रेनच्या जागी अँड्र्यू टाय आणि वरुण अॅरोनचा समावेश करण्यात आला होता.

प्रथम फलंदाजीस आलेल्या दिल्ली कॅपिटलने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून 184 धावा केल्या. राजस्थान रॉयल्सपुढे 185 धावांचे लक्ष्य होते. दिल्लीकडून शिमरोन हेटमेयर सर्वाधिक 45 धावा केल्या. राजस्थान रॉयल्स संघ 138 धावांवर ऑलआऊट झाला. दिल्लीच्या रबाडाने तीन विकेट घेतले.

दिल्ली कॅपिल्सने या मोसमातील आपला पाचवा विजय नोंदविला आहे. राजस्थान रॉयल्सचा हा सलग चौथा पराभव आहे. दिल्लीने हा सामना 46 धावांनी जिंकला.

 

मागे

IPL 2020: हैदराबादचा पंजाबवर 69 रनने विजय
IPL 2020: हैदराबादचा पंजाबवर 69 रनने विजय

आयपीएल सीजन 13 च्या 22 व्या सामन्यात हैदराबादने पंजाबला 69 रनने पराभव केला आहे. ....

अधिक वाचा

पुढे  

IPL 2020 : चेन्नईच्या पाचव्या पराभवानंतर धोनी संतापला; 'या' खेळाडूंवर फोडलं खापर
IPL 2020 : चेन्नईच्या पाचव्या पराभवानंतर धोनी संतापला; 'या' खेळाडूंवर फोडलं खापर

इंडियन प्रिमीयर लीगमध्ये (Indian Premier League) शनिवारी रात्री झालेल्या सामन्यात रॉयल च....

Read more