ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

IPL 2020, MI vs DC Final:मुंबई विरुद्ध दिल्ली आमनेसामने, कोण पटकावणार विजेतेपद ?

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 10, 2020 09:32 AM 2019-02-12T14:15:30+5:30

IPL 2020, MI vs DC Final:मुंबई विरुद्ध दिल्ली आमनेसामने, कोण पटकावणार विजेतेपद ?

शहर : मुंबई

आयपीएलच्या 13 व्या (IPL 2020) मोसमातील अंतिम सामना (IPL 2020 Live) आज (10 नोव्हेंबर) खेळण्यात येणार आहे. हा अंतिम सामना मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात खेळण्यात येणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळण्यात येणार आहे. मुंबईला पाचव्यांदा तर दिल्लीला पहिल्यांदा विजेतेपद पटकावण्याची संधी आहे.

मुंबई दिल्लीला वरचढ

आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत मुंबई आणि दिल्ली आतापर्यंत एकूण 27 वेळा आमनेसामने भिडले आहेत. या 27 पैकी 15 सामन्यात मुंबईने दिल्लीवर विजय मिळवला आहे. तर दिल्लीनेही मुंबईचा 12 वेळा पराभव केला आहे. मुंबईने या मोसमातील साखळी फेरीतील दोन्ही सामन्यात दिल्लीचा पराभव केला. तसेच क्वालिफायर 1 सामन्यातही मुंबईने दिल्लीवर विजय मिळवला. त्यामुळे मुंबई दिल्लीवर वरचढ राहिली आहे.

मुंबईची 5 वी तर दिल्लीची पहिली वेळ

आयपीएलच्या अंतिम सामन्यात पोहचण्याची ही 5 वी वेळ आहे. याआधी मुंबईने 2010, 2013, 2015, 2017 आणि 2019 मध्ये फायलनमध्ये धडक मारली होती. यामध्ये 2010 या सालचा अपवाद वगळता मुंबईने प्रत्येक वेळेस विजेतेपद पटकावलं आहे. चेन्नईने 2010 मध्ये अंतिम सामन्यात मुंबईचा पराभव केला होता. तर दुसऱ्या बाजूला दिल्लीची अंतिम सामन्यात पोहचण्याची ही पहिलीच वेळ आहे. मुंबईला अंतिम सामन्यात खेळण्याचा अनुभव आहे. तर दिल्लीची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे अनुभवी मुंबईसमोर दिल्ली कशी कामगिरी करते, याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.

यशस्वी कर्णधार

रोहित शर्मा हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार राहिला आहे. रोहितने आपल्या नेतृत्वात 4 ही वेळा मुंबईला विजेतेपद मिळवून दिलं आहे. या मोसमातील अंतिम सामन्यात नाणेफेकीसाठी मैदानात येताच रोहितच्या नावावर अनोख्या विक्रमाची नोंद होणार आहे. असा भीम पराक्रम करणारा तो दुसराच खेळाडू ठरणार आहे. दिल्लीविरुद्धचा अंतिम सामना हा रोहितच्या आयपीएल कारकिर्दीतील 200 वा सामना असणार आहे. त्यामुळे रोहितकडून या अंतिम सामन्यात चमकदार कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

दोन्ही संघाचे कर्णधार मुंबईकर

मुंबई आणि दिल्ली या दोन्ही संघांचे कर्णधार मूळचे मुंबईकर आहेत. यामुळे या अंतिम सामन्यात हे दोन्ही मुंबईकर खेळाडूंच्या कामगिरीवर लक्ष असणार आहे.

 

शिखर धवनला रोखण्याचे आव्हान

गब्बर शिखर धवनकडे अंतिम सामन्यात साऱ्यांचेच लक्ष असणार आहे. गब्बरने या मोसमात चमकदार कामगिरी केली आहे. धवनने या मोसमात आतापर्यंत एकूण 16 सामन्यात 145.65 च्या स्ट्राईक रेटने आणि 46.38 च्या सरासरीने 603 धावा केल्या आहेत. यामध्ये 2 शतक आणि 4 अर्धशतकांचा समावेश आहे. त्यामुळे मुंबईच्या गोलंदाजांसमोर शिखर धवनला रोखण्याचे आव्हान असणार आहे.

कगिसो रबाडाचा भेदक मारा

दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा या मोसमात धमाकेदार गोलंजाजी करतोय. तसेच रबाडा या मोसमात आतापर्यंत सर्वाधिक विकेट्स घेणार गोलंदाज ठरला आहे. त्याने एकूण 14 सामन्यात 29 विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्याकडे पर्पल कॅपही आहे. त्यामुळे मुंबईच्या फलंदाजांसमोर कगिसोसमोर सावधपणे खेळावे लागणार आहे.

मुंबईची तगडी बॅटिंग लाईनअप

मुंबईकडे तगडी बॅटिंग लाईनअप आहे. यामध्ये क्विंटन डी कॉक, सूर्यकुमार यादव, कर्णधार रोहित शर्मा, इशान किशन, कायरन पोलार्ड, पंड्या बंधू यासारखे एकसेएक तगडे फलंदाज आहेत. हे सर्व फलंदाज आपल्या आक्रमक आणि हार्ड हिटिंगसाठी प्रसिद्ध आहेत. या सर्वफलंदाजांनी या मोसमात चांगली कामगिरी केली आहे. तसेच या सर्व खेळाडूंमध्ये निर्णायक क्षणी सामना पलटवण्याची क्षमता आहे. त्यामुळे दिल्लीसमोर या सर्व फलंदाजांना रोखण्याचे आव्हान असेल.

जसप्रीत बुमराह आणि ट्रेन्ट बोल्ट

मुंबईच्या जसप्रीत बुमराह आणि ट्रेन्ट बोल्ट ही गोलंदाजांची जोडी आयपीएलच्या 13 व्या मोसमात दमदार कामगिरी करत आहेत. या दोघांनी आतापर्यंत या मोसमात एकूण 49 विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. यामध्ये बुमराहच्या नावावर 27 तर बोल्टच्या नावावर 22 विकेट्सची नोंद आहे. बोल्टने केलेल्या कामगिरीसाठी त्याला या मोसमात 2 वेळा सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. त्यामुळे दिल्लीला या गोलंदाजांपासून सावध राहावे लागणार आहे.

मुंबई आणि दिल्लीचे संघ

मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार) कायरन पोलार्ड, आदित्य तरे, अनमोलप्रीत सिंह, अनुकूल रॉय, ख्रिस लिन, धवल कुलकर्णी, दिग्विजय देशमुख, हार्दिक पांड्या, ईशान किशन, जेम्स पेटिन्सन, जसप्रीत बुमराह, जयंत यादव, कृणाल पांड्या, मिचेल मॅक्लेनघन, मोहसिन खान, नॅथन कूल्टर नाइल, प्रिंस बलवंत राय, क्विंटन डी कॉक, राहुल चहर, सौरभ तिवारी, शेरफेन रुदरफोर्ड, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि ट्रेन्ट बोल्ट.

दिल्ली कॅपिटल्स : श्रेयस अय्यर (कर्णधार), रविचंद्रन अश्विन, शिखर धवन, पृथ्वी शॉ, शिमरॉन हेटमायर, कगिसो रबाडा, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, अक्षर पटेल, संदीप लमिछाने, किमो पॉल, डॅनियल सॅम्स, मोहित शर्मा, एनरिक नोर्तजे, अॅलेक्स कॅरी, अवेश खान, तुषार देशपांडे, हर्षल पटेल, मार्कस स्टोयनिस आणि ललित यादव.

मागे

IPL 2020: मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटलमध्ये रंगणार फायनल
IPL 2020: मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटलमध्ये रंगणार फायनल

इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या मोसमाच्या सुरूवातीपासूनच दमदार खेळी करणार्....

अधिक वाचा

पुढे  

IPL 2020 Final MI vs DC : मुंबई-दिल्ली अंतिम सामन्याविषयी 6 रंजक गोष्टी
IPL 2020 Final MI vs DC : मुंबई-दिल्ली अंतिम सामन्याविषयी 6 रंजक गोष्टी

आयपीएलच्या 13 व्या (IPL 2020) मोसमातील अंतिम सामना आज (10 नोव्हेंबर) खेळवण्यात येणार ....

Read more