By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 21, 2020 10:59 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
आयपीएल २०२० मध्ये दिल्ली कॅपिटलचा सलामीवीर शिखर धवनने आपल्या फलंदाजीने पुन्हा एकदा सर्वांना आकर्षित केले आहे. धवनने आपला फलंदाजीचा फॉर्म कायम ठेवत मंगळवारी किंग्ज इलेव्हन पंजाब (केएक्सआयपी) विरुद्ध नाबाद शतकीय खेळी केली.
गेल्या दोन सामन्यात गब्बरने सलग दुसरे शतक ठोकले. या शतकीय खेळीसह शिखर धवनने इंडियन प्रीमियर लीगमध्ये नवा इतिहास रचला आहे. मात्र, धवनच्या शतकी खेळीनंतरही दिल्लीला पराभवाचा सामना करावा लागला.
आयपीएलमध्ये सलग दोन शतके ठोकणारा पहिला खेळाडू
विशेष म्हणजे आयपीएल 13 मध्ये शिखर धवन आता स्फोटक खेळी खेळत आहे. त्याने किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध नाबाद ६१ बॉलमध्ये १०६ रन केले. ज्यामध्ये १२ फोर आणि ३ सिक्सचा समावेश आहे. यासह आयपीएलच्या दोन सामन्यात सलग दोन शतके ठोकणारा धवन एकमेव खेळाडू ठरला आहे. धवनने याआधी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध नाबाद १०१ धावांची स्फोटक खेळी केली होती.
या शतकीय खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटलचा सलामीवीर शिखर धवनने सामन्याआधी बनवलेली १०१ * धावांची स्वत:ची सर्वोत्कृष्ट धावसंख्या तोडली आहे. आता आयपीएलमधील गब्बरची सर्वोत्कृष्ट कामगिरी नाबाद १०६ धावांची आहे.
या आश्चर्यकारक शतकाच्या खेळीमुळे शिखर धवनने पंजाबसमोर खेळताना आपल्या आयपीएल कारकीर्दीतील ५००० धावांचा टप्पा ओलांडला आहे. या सामन्याआधी धवनला आयपीएलमध्ये ५ हजारी होण्यासाठी ६२ धावांची आवश्यकता होती.
वास्तविक शिखर धवन हा आयपीएलमध्ये ५ हजार रन करणारा पाचवा खेळाडू आहे. त्याचबरोबर धवन हा भारतीय म्हणून हा रेकॉर्ड करणारा चौथा फलंदाज आहे. सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने काही दिवसांपूर्वीच ५ हजार रन पूर्ण केले होते. या शतकीय खेळीमुळे गब्बर आता ५०४४ धावांनी चौथ्या स्थानी आला आहे. तर त्याचवेळी वॉर्नर ५०३७ धावा घेऊन पाचव्या स्थानावर आला आहे
राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) चेन्नई सुपर किंग्जसवर (Chennai Super Kings) 7 विकेटने दणदणीत वि....
अधिक वाचा