ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

IPL 2020 : हैदराबादला नमवत मुंबईचा संघ विजयी

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 04, 2020 08:37 PM 2019-02-12T14:15:30+5:30

IPL 2020 : हैदराबादला नमवत मुंबईचा संघ विजयी

शहर : मुंबई

आयपीएलच्या IPL 2020 यंदाच्या हंगामातील आणखी एक सामना शारजाह येथील स्टेडियममध्ये पार पडला. या सामन्यादरम्यान मुंबई आणि हैदराबाद असे दोन संघ एकमेकांसमोर उभे ठाकले. या सामन्यात मुंबईच्या संघानं हैदराबादवर ३४ धावांनी मात केली. या सामन्यासाठी मुंबईच्या संघात कोणताही बदल करण्यात आला नव्हता.

इथं हैदराबादच्या संघात दुखापतग्रस्त भुवनेश्वर कुमार याच्याऐवजी संदीप शर्मा आणि खलील अहमद याच्या जागी सिद्धार्थ कौल यांना स्थान देण्यात आलं. सामन्यात नाणेफेक जिंकत मुंबईच्या संघानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या मुंबईच्या संघानं २० षटकांमध्ये गडी बाद २०८ धावा करत विरोधी संघापुढं २०९ धावांचं लक्ष ठेवलं. मुंबईकडून क्विंटन डे कॉकनं सर्वाधिक म्हणजेच ६७ धावा केल्या. मुंबईचं हे आव्हान पेलत हैदराबादचा संघ मैदानात आला.

हैदराबादच्या खेळाडूंनी २० षटकांमध्ये गडी गमावत अवघ्या १७४ धावाच केल्या. परिणामी हा सामना मुंबईनं जिंकला. या सामन्यातील विजयासह मुंबईच्या संघानं आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील तिसऱ्या विजयाची नोंद केली. तर, हैदराबादच्या संघाताल तिसऱ्यांदा पराभवाला सामोरं जावं लागलं.

मागे

IPL 2020 DC vs KKR : चुरशीच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा कोलकाता नाइट रायडर्सवर विजय
IPL 2020 DC vs KKR : चुरशीच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा कोलकाता नाइट रायडर्सवर विजय

अतिशय चुरशीच्या अशा सामन्यात शनिवारी दिल्ली कॅपिटल्सने कोलकाता नाइट रायड....

अधिक वाचा

पुढे  

KXIP vs CSK : वॉटसन आणि डू प्लेसिसने रचली IPL इतिहासातील सर्वात मोठी पार्टनरशीप
KXIP vs CSK : वॉटसन आणि डू प्लेसिसने रचली IPL इतिहासातील सर्वात मोठी पार्टनरशीप

महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जसने (Chennai Super Kings) काल (रविवारी) रात्री झा....

Read more