By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 22, 2020 10:25 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (Royal Challengers Banglore) कोलकाता नाईट रायडर्सवर (Kolkata Knight Riders) 8 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. कोलकाताने बंगळुरुला विजयासाठी 85 धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान बंगळुरुने 2 विकेट्स गमावत 13.3 ओव्हरमध्येच पूर्ण केलं. बंगळुरुकडून देवदत्त पडिक्कलने सर्वाधिक 25 धावा केल्या. तर गुरुकीरत मानने नाबाद 21 धावा केल्या. या विजयासह बंगळुरुने मुंबईला पछाडत पॉइंट्सटेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
विजयी आव्हानाचे पाठलाग करायला आलेल्या बंगळुरुची चांगली सुरुवात झाली. अॅरॉन फिंच आणि देवदत्त पडीक्कल या जोडीने 46 धावांची सलामी भागीदारी केली. यानंतर अॅरॉन फिंच 16 धावांवर बाद झाला. फिंचच्या मागोमाग देवदत्त पडीक्कल 25 धावांवर रनआऊट झाला. यानंतर कर्णधार विराट कोहली आणि गुरुकीरत मान या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी नाबाद 39 धावांची नाबाद विजयी भागीदारी केली. विराटने नाबाद 18 तर गुरुकीरतने नाबाद 21 धावा केल्या. कोलकाताकडून लॉकी फॅर्ग्युसनने एकमेव विकेट घेतली.
याआधी कोलकाताने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. बंगळुरुच्या भेदक माऱ्यासमोर कोलकाता डाव अवघ्या 84 धावांवर आटोपला. बॅटिंगसाठी आलेल्या कोलकाताला बंगळुरुच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनचच झटके द्यायला सुरुवात केली. इयॉन मॉर्गनचा अपवाद वगळता कोणत्याही खेळाडूला चांगली खेळी करता आली नाही. कोलकाताकडून कर्णधार मॉर्गनने सर्वाधिक 30 धावांची खेळी केली. तर शेवटच्या काही ओव्हरमध्ये कुलदीप यादव आणि लॉकी फर्ग्युसनने छोटी खेळी केली. या दोघांनी प्रत्येकी अनुक्रमे 12 आणि 19 धावा केल्या. बंगळुरुकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. त्याने आपल्या 4 ओव्हरच्या स्पेलमध्ये अवघ्या 8 धावाच दिल्या. तसेच त्याने 2 निर्धाव टाकल्या. युझवेंद्र चहलने 2 विकेट्स घेतल्या. तर वॉशिंग्टन सुंदर आणि नवदीप सैनीने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
प्लेऑफच्या दृष्टीने हा सामना कोलकाता आणि बंगळुरु या दोन्ही संघांसाठी महत्वाचा आहे. पॉइंट्सटेबलमध्ये बंगळुरु आणि कोलकाता अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत. बंगळुरुचे एकूण 12 तर कोलकाताचे 10 पॉइंट्स आहेत. प्लेऑफच्या अंतिम 4 मध्ये पोहचण्यासाठी हा विजय मिळवण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असणार आहे. मात्र कोणता संघ कोणावर वरचढ ठरणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
आयपीएल २०२० मध्ये दिल्ली कॅपिटलचा सलामीवीर शिखर धवनने आपल्या फलंदाजीने पु....
अधिक वाचा