ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

IPL 2020 : दोन सुपर ओव्हरनंतर पंजाबचा मुंबईवर दणदणीत विजय

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 19, 2020 11:30 AM 2019-02-12T14:15:30+5:30

IPL 2020 : दोन सुपर ओव्हरनंतर पंजाबचा मुंबईवर दणदणीत विजय

शहर : मुंबई

एकाच दिवसात तीन वेळा सुपर ओव्हर होणारा हा पहिलाच दिवस असेल. कोलकाता विरुद्ध हैद्राबाद सामन्यात देखील एक सुपर ओव्हर झाली होती. यानंतर मुंबई विरूद्ध पंजाब सामन्यात चक्क दोन वेळा सुपर ओव्हर झाली. दोन वेळा टाय झाल्यानंतर पंजाबच्या क्रिस गेलने सुपर ओव्हरमध्ये पहिल्याच चेंडूला षटकार मारून विजय आपल्याकडे खेचून आणला.

पंजाब आणि मुंबईत पहिली सुपर ओव्हर टाय झाल्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये क्रिस गेलने सामना आपल्या संघाकडे खेचून आणला. पहिल्या सुपर ओव्हरमध्ये मुंबईने पाच धावा केल्या याचा पाठलाग करत किंग्स इलेव्हन पंजाब संघ देखील पोहोचला आणि ती सुपर ओव्हर टाय झाली. यानंतर दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये मुंबईने ११ धावा करून सामना रंजक केला. मात्र क्रिस गेलने आपल्या मेहनतीने खेळ खेचून आणला आणि दणदणीत विजय मिळवला.

पंजाब आणि मुंबईतील हा सामना रोमांचक ठरला. पहिल्या सुपर ओव्हरनंतर सामना आणखीच रोमांचक ठरला. या सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाबच्या मयांक अग्रवालची देखील चर्चा झाली. चेंडू अडवण्यासाठी त्याने खेळलेली खेळी कौतुकास्पद होती.

इतिहासात आज अनोखा रेकॉर्ड ठरला. मुंबई विरूद्ध पंजाबच्या सामन्यात मुंबईने पंजाबला १७७/६ धावांच लक्ष दिलं. याचा पाठलाग करत किंग्स इलेव्हन पंजाबची १७६ धावा करून टाय झालं. यानंतर दोन सुपर ओव्हर झाली. ज्यामध्ये पंजाबने उत्तम खेळ दाखवत दणदणीत विजय मिळवला.

 

मागे

IPL 2020: दिल्लीचा चेन्नईवर पाच विकेट्स राखून विजय
IPL 2020: दिल्लीचा चेन्नईवर पाच विकेट्स राखून विजय

दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यामध्ये आज दुसरा सामना रंगला. ....

अधिक वाचा

पुढे  

IPL 2020, CSK vs RR : राजस्थानचा 'हल्लाबोल', चेन्नईवर 7 विकेटने मात
IPL 2020, CSK vs RR : राजस्थानचा 'हल्लाबोल', चेन्नईवर 7 विकेटने मात

राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) चेन्नई सुपर किंग्जसवर (Chennai Super Kings) 7 विकेटने दणदणीत वि....

Read more