By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 29, 2020 10:12 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
आयपीएलच्या 13 व्या (IPL 2020) मोसमातील 48 वा सामना आज (28 ऑक्टोबर) खेळला गेला. हा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात खेळला गेला. सूर्यकुमार यादवच्या नाबाद 79 धावांच्या जोरावर मुंबईने बंगळुरुवर 5 विकेट्सने शानदार विजय मिळवला. सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह मुंबईच्या विजयाचे हिरो ठरले. जसप्रीत बुमराहने बंगळुरुच्या 3 फलंदाजांना बाद केलं. त्याने 4 ओव्हरमध्ये 13 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. यामध्ये 1 मेडन ओव्हरचा समावेश होता. यासह बुमराहने विक्रमी कामगिरी केली.
जसप्रीत बुमराहने आयपीएलमध्ये 100 विकेट्स घेण्याची कामगिरी केली. बुमराहने बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीला बाद करत 100 वी विकेट घेतली. बुमराहने 89 सामन्यात 100 विकेट्स पूर्ण केल्या. विशेष म्हणजे बुमराहने आयपीएलमध्ये पहिली विकेटही विराट कोहलीला बाद करत मिळवली होती. बुमराहच्या नावावर एकूण 102 विकेट्सची नोंद झाली. यासह त्याने झहीर खानच्या कामगिरीशी बरोबरीही केली.बुमराहची आयपीएल कारकिर्द
how it started how it’s going pic.twitter.com/EhpOd5tvBR
— Mumbai Indians (@mipaltan) October 28, 2020
जसप्रीत बुमराहने 2013 मध्ये मुंबई इंडियन्सकडून पदार्पण केलं. बुमराहने आतापर्यंत 89 सामन्यात एकूण 102 विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत बुमराह 17 व्या क्रमांकावर आहे. आयपीएलमध्ये आतापर्यंत लसिथ मलिंगा, ड्वेन ब्राव्हो, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, आशीष नेहरा, झहीर खान आणि आर विनय कुमार या वेगवान गोलंदाजांनीच 100 विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. त्यामुळे बुमराह आयपीएलमध्ये 100 विकेट्स पूर्ण करणारा 8 वा वेगवान गोलंदाज ठरला.
बुमराहची यंदाच्या मोसमातील कामगिरी
बुमराहने आयपीएलच्या या मोसमात आतापर्यंत धमाकेदार कामगिरी केली आहे. बुमराहने या मोसमातील 12 सामन्यात 20 विकेट्स घेतल्या आहे. बुमराहने 20 धावा देत 4 विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. ही त्याची सर्वोत्कृष्ठ कामगिरी आहे. यंदाच्या मोसमात मुंबईकडून ट्रेन्ट बोल्ट आणि बुमराह हे दोघे दमदार गोलंदाजी करत आहेत.
सर्वाधिक विकेट्स
आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम लसिथ मलिंगाच्या नावावर आहे. मलिंगाने 122 सामन्यात 170 विकेट्स घेतल्या आहेत. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर अमित मिश्रा आहे. मिश्राने 150 मॅचेसमध्ये 160 बळी घेतल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर पीयूष चावला आहे. चावलाने 164 सामन्यात 156 फलंदाजांना माघारी धाडलं आहे.
आयपीएल २०२० चा 48 वा सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात....
अधिक वाचा