ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

IPL 2020 : चेन्नईच्या पाचव्या पराभवानंतर धोनी संतापला; 'या' खेळाडूंवर फोडलं खापर

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 11, 2020 10:00 AM 2019-02-12T14:15:30+5:30

IPL 2020 : चेन्नईच्या पाचव्या पराभवानंतर धोनी संतापला; 'या' खेळाडूंवर फोडलं खापर

शहर : मुंबई

इंडियन प्रिमीयर लीगमध्ये (Indian Premier League) शनिवारी रात्री झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (Royal Challengers Bangalore) चेन्नई सुपर किंग्जसचा (Chennai Super Kings) 37 धावांनी पराभव केला. बंगळुरुने चेन्नईला विजयासाठी 170 धावांचे आव्हान दिले होते. मात्र चेन्नईला 20 षटकांमध्ये 8 विकेट्स गमावून अवघ्या 132 धावाच करता आल्या. (IPL 2020 : MS Dhoni slams Batsman of CSK after fifth defeat)

या सामन्यात चेन्नईकडून अंबाती रायुडू आणि नारायण जगदीशनचा अपवाद वगळता कोणत्याही खेळाडूला चांगली खेळी करता आली नाही. चेन्नईकडून अंबाती रायुडूने सर्वाधिक 42 तर नारायण जगदीशनने 33 धावा केल्या. तसेच या सामन्यात धोनीने पुन्हा निराशा केली. धोनी 10 धावांवर बाद झाला. बंगळुरुच्या गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली. त्यांनी चेन्नईच्या रायुडूवगळता एकाही फलंदाजाला डोकं वर काढू दिलं नाही. या सामन्यातील पराभवामुळे चेन्नईचा कर्णधार खूप निराश झाल्याचे पाहायला मिळाले. सामन्यानंतरच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमामध्ये धोनीने त्याची निराशा व्यक्त केली.

आयपीएलच्या यंदाच्या मोसमात चेन्नईचा संघ काल पाचव्यांदा पराभूत झाला. कर्णधार धोनीने संघाच्या या खराब कामगिरीचं खापर चेन्नईच्या फलंदाजांवर फोडलं, तसेच गोलंदाजांच्या कामगिरीबाबत धोनीने निराशा व्यक्त केली. धोनी म्हणाला की, गोलंदाजी करत असताना आम्ही शेवटच्या चार षटकांमध्ये चांगली कामगिरी केली नाही.

फलंदाजांबाबत बोलताना धोनी म्हणाला की, आमच्या फलंदाजांनी चांगला खेळ करण्याची आवश्यकता होती. फलंदाजी आमचा चिंतेचा विषय आहे. आजच्या सामन्यात ही बाब पुन्हा एकदा प्रकर्षाने जाणवली. संघाच्या फलंदाजीबाबत आम्हाला काहीतरी करावं लागणार आहे.

धोनी म्हणाला की, आम्हाला वेगळ्या पद्धतीने खेळावं लागणार आहे. आम्ही मोठे फटके मारायला हवे होते, भले आम्ही बाद झालो असतो तरी चाललं असतं. परंतु आम्ही आक्रमकपणे फलंदाजी करायला हवी होती. पुढील सामन्यात आम्ही तसा प्रयत्न करु. सहाव्या षटकानंतर आमच्या फलंदाजांची गती कमी होते. आमचा खेळ पाहताना असं जाणवतं की, आम्ही कोणत्याही रणनीतिसह मैदानात उतरलेलो नाही. आमच्या संघात अनेक कमतरता आहेत.

मागे

IPL 2020: दिल्लीचा राजस्थानवर 46 रनने विजय
IPL 2020: दिल्लीचा राजस्थानवर 46 रनने विजय

आयपीएलच्या 23 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटलने राजस्थान रॉयल्सचा 46 धावांनी परा....

अधिक वाचा

पुढे  

रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून कोलकाता नाईट रायडर्सचा 82 धावांनी दणदणीत पराभव
रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून कोलकाता नाईट रायडर्सचा 82 धावांनी दणदणीत पराभव

विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोरनं कोलकाता नाईट रायडर्सचा 82 धावांनी ....

Read more