By DAYANAND MOHITE | प्रकाशित: सप्टेंबर 19, 2020 11:38 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा पराभव करत महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जने आयपीएलच्या तेराव्या सीजनची विजयी सुरुवात केली आहे. चेन्नईने मुंबईवर पाच विकेट्ने मात केली. चेन्नईच्या विजयात अंबाती रायडू आणि फाफ डु प्लेसिसने महत्त्वाची कामगिरी बजावली. चेन्नईची सुरुवात खराब झाली. मुरली विजय आणि शेन वॉटसन पहिल्या दोन षटकातच स्वस्तात माघारी फिरले.
त्यानंतर मैदानात उतरलेल्या अंबाती रायडू आणि फाफ डू प्लेसिसने डाव सावरला. अंबाती रायडूने सर्वाधिक 71 धावा केल्या तर फाफ डू प्लेसिस 58 धावा करत त्याला साथ दिली. मुंबईकडून ट्रेंट बोल्ट, पॅटिनसन, जसप्रीत बुमराह, कृणाल पांड्या, राहुल चहर यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.
त्याआधी मुंबई इंडियन्सनं चेन्नई सुपर किंग्ससमोर 163 धावांचं आव्हान ठेवलं होतं. चेन्नईच्या प्रभावी माऱ्यासमोर मुंबईला 9 बाद 162 धावांचीच मजल मारता आली. वेगवान गोलंदाज दीपक चहर आणि लुंगी एनगीडीनं सुरुवातीपासूनच मुंबईच्या फलंदाजांवर वर्चस्व गाजवलं. एनगीडीनं तीन तर चहरनं दोन फलंदाजांना माघारी धाडलं. रविंद्र जाडेजानंही दोन विकेट्स घेत त्यांना सुरेख साथ दिली. मुंबईकडून सौरभ तिवारीनं सर्वाधिक 43 धावा फटकावल्या. तर क्विंटन डी कॉकनं 33 धावांचं योगदान दिलं.
मुंबईचे ओपनर रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉक यांनी फटकेबाजी करत वेगवान सुरुवात करुन दिली. मात्र पीयुष चावलाने रोहित शर्माला माघारी धाडलं. त्यानंतरच्या षटकात सॅम कर्रानने क्विंटन डी कॉकला माघारी धाडलं. त्यानंतर लुंगी एनगीडीनं तीन विकेट घेत मुंबईच्या धावसंख्येला ब्रेक लावला.
दीपक चहरचा अनोख विक्रम
आयपीएलच्या कारकिर्दीत दीपक चहर असा गोलंदाज बनला ज्याने सलग तीन सीजन आयपीएलमधील पहिला चेंडू टाकला. याआधी कोणत्याही गोलंदाजाला ही कामगिरी करता आलेली नाही. चहरने आयपीएल 2018 मध्ये मुंबईविरुद्ध सीजनमधील पहिला चेंडू टाकला. त्याच वेळी, आयपीएल 2019 मध्येही त्याने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध सीजनचा पहिला चेंडू टाकला आणि यंदा पुन्हा मुंबई विरुद्ध त्याने सीजनचा पहिला चेंडू टाकला.
IPL 2020- कोरोना व्हायरसच्या (coronavirus)साथीमुळे IPL साठी खबरदारीचे सर्व उपाय लागू करण्य....
अधिक वाचा