By DAYANAND MOHITE | प्रकाशित: सप्टेंबर 19, 2020 10:58 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
आयपीएलच्या १३व्या मोसमाला शनिवारपासून सुरुवात होणार आहे. गतविजेती मुंबई आणि चेन्नईच्या टीममध्ये पहिला सामना रंगणार आहे. कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे यंदा प्रेक्षकांशिवायच सामने होणार आहेत. तसंच युएईमधल्या संथ खेळपट्ट्यांमुळे सगळ्याच टीमना वेगळी रणनिती अवलंबवावी लागणार आहे.
चेन्नईला सुरुवातीलाच धक्के
चेन्नईच्या टीमला आयपीएल सुरु व्हायच्या आधीच दोन धक्के बसले आहेत. सुरेश रैना आणि हरभजन सिंग यांनी स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्यामुळे धोनीला या दोन तगड्या खेळाडूंचे बदली खेळाडू शोधावे लागणार आहेत. तर रैनाचा बदली खेळाडू म्हणून मानला जाणारा ऋतुराज गायकवाड अजूनही पूर्णपणे फिट नाही, त्यामुळे तो पहिली मॅच खेळणार नाही. अशा परिस्थितीमध्ये केदार जाधव आणि रवींद्र जडेजावर मोठी जबाबदारी येऊ शकते.
चेन्नईकडून शेन वॉटसन, अंबाती रायुडू ओपनिंगला खेळण्याची शक्यता आहे. धोनीकडे फाफ डुप्लेसिसलाही खेळवण्याचा पर्याय आहे. पण टीम संयोजनावर या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. नियमानुसार टीममध्ये ४ परदेशी खेळाडू असू शकतात, त्यामुळे वॉटसन आणि ब्राव्होचं खेळणं निश्चित आहे. तर बॉलिंगमध्ये लुंगी एनगिडी, इमरान ताहीर आणि मिचेल सॅन्टनर हे तीन पर्याय आहेत.
आयपीएलच्या 13 व्या मोसमाचं बिगुल वाजलं आहे. 13 व्या मोसमातील सलामीचा सामना खेळ....
अधिक वाचा