ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

IPL 2020: जसप्रीत बुमराहची कमाल, दिल्लीवर 57 धावांनी मात, मुंबईची सहाव्यांदा फायनलमध्ये धडक

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 06, 2020 09:25 AM 2019-02-12T14:15:30+5:30

IPL 2020: जसप्रीत बुमराहची कमाल, दिल्लीवर 57 धावांनी मात, मुंबईची सहाव्यांदा फायनलमध्ये धडक

शहर : मुंबई

मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) दिल्ली कॅपिटल्सवर (Delhi Capitals) 57 धावांनी मात करत आयपीएलच्या 13 व्या मोसमातील (IPL 2020) अंतिम सामन्यात धडक मारली आहे. मुंबईची अंतिम फेरीत पोहचण्याची ही सहावी वेळ ठरली. मुंबईने दिल्लीला विजयासाठी 201 धावांचे तगडे आव्हान दिले होते. मात्र दिल्लीला निर्धारित 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 143 धावाच करता आल्या. दिल्लीकडून मार्कस स्टोयनिसने 65 तर अक्षर पटेलने 42 धावांची खेळी केली. मुंबईकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.

विजयी आव्हानाचे पाठलाग करायला आलेल्या दिल्लीची निराशाजनक सुरुवात राहिली. दिल्लीने पहिले 3 विकेट्स शून्यावर गमावले. पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे आणि शिखर धवन तिघेही तगडे फलंदाज शून्यावर बाद झाले. त्यामुळे दिल्लीची 1.2 ओव्हरमध्ये 0-3 अशी परिस्थिती झाली. यानंतर श्रेयस अय्यर आणि मार्कस स्टोयनिसने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र जसप्रीत बुमराहने दिल्लीला चौथा झटका दिला. कर्णधार श्रेयस अय्यर 12 धावांवर बाद झाला. मुंबईने दिल्लीला ठराविक अंतराने झटके देण्याची मालिका सुरुच ठेवली. दिल्लीची धावसंख्या 41 असताना कृणाल पंड्याने ऋषभ पंतला 3 धावांवर सूर्यकुमार यादवच्या हाती कॅच आऊट केलं.

यानंतर सहाव्या विकेटसाठी मार्क्स स्टोयनिस आणि अक्षर पटेलने 71 धावांची भागीदारी केली. या भागीदारीदरम्यान मार्कस स्टोयनिसने अर्धशतक पूर्ण केलं. स्टोयनिस आक्रमक खेळी करत होता. मुंबईला डोकेदुखी ठरणाऱ्या स्टोयनिसचा बुमराहने काटा काढला. बुमराहने स्टोयनिसला 65 धावांवर बाद केलं. स्टोयनिसने 46 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकारांसह 65 धावांची चांगली खेळी केली. डॅनियल सॅम्सला बुमराहने शून्यावर माघारी पाठवले.

 

यानंतर फटकेबाजी करत असलेल्या अक्षर पटेलला कायरन पोलार्डने आपल्या बोलिंगवर राहुल चाहरच्या हाती झेल बाद केलं. अक्षरने 33 चेंडूत 2 फोर आणि 3 सिक्ससह 42 धावा केल्या. मुंबईकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. ट्रेन्ट बोल्टने 2 विकेट्स घेत बुमराहला चांगली साथ दिली. तर कृणाल पंड्या आणि कायरन पोलार्डने प्रत्येकी 1 विकेट मिळवला.

त्याआधी दिल्लीने टॉस जिंकून मुंबईला बॅटिंगसाठी भाग पाडले. मुंबईने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 200 धावा केल्या. मुंबईकडून इशान किशनने सर्वाधिक नाबाद 55 धावा केल्या. तर सूर्यकुमार यादवने 51 धावांची खेळी केली. क्विंटन डी कॉकने 40 रन्स केल्या. तर हार्दिक पंड्याने शेवटच्या षटकात फटकेबाजी केली. हार्दिकने अवघ्या 14 चेंडूत 5 सिक्सच्या मदतीने 37 धावांची खेळी केली. मुंबईचे हार्डहिटर असलेले कायरन पोलार्ड आणि रोहित शर्मा हे दोघेही अपयशी ठरले. या दोघांना भोपळाही फोडता आला नाही. दोघेही शून्यावर बाद झाले. दिल्लीकडून रवीचंद्रन आश्विनने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर एनरिच नोर्तजे आणि मार्कस स्टोयनिसने प्रत्येकी 1 विकेट मिळवला.

मुबई सहाव्यांदा फायनलमध्ये

दिल्लीचा पराभव करत मुंबईने फायनलमध्ये धडक मारली आहे. फायनलमध्ये धडक मारण्याची मुंबईची ही सहावी वेळ ठरली आहे. मुंबईने याआधी 2010, 2013, 2015, 2017 आणि 2019 पाचवेळा फायनलमध्ये धडक दिली. मुंबईने 5 फायनल सामन्यातून 4 वेळा अंतिम सामन्यात विजय मिळवत आयपीएल विजेतेपद पटकावलं आहे.

दिल्लीला आणखी एक संधी

दिल्लीला पराभवानंतरही अंतिम फेरी गाठण्यासाठी आणखी एक संधी मिळणार आहे. 6 नोव्हेंबरला बंगळुरु विरुद्ध हैदराबाद यांच्यात एलिमिनेटर सामना खेळण्यात येणार आहे. या सामन्यातील विजेता संघ 8 नोव्हेंबरला दिल्लीविरुद्ध क्वालिफायर 2 सामन्यात भिडणार आहे. त्यामुळे दिल्लीला मुंबईविरुद्धच्या पराभवानंतरही फायनलमध्ये पोहचण्यासाठी संधी मिळणार आहे.

प्ले ऑफमधील कामगिरी

मुंबईची प्ले ऑफ (IPL PLAYOFFS) सामन्यात चांगली कामगिरी राहिली आहे. मुंबईने याआधी एकूण 5 वेळा प्ले ऑफ फेरीत सामने खेळले आहेत. या 5 पैकी 4 सामन्यात मुंबईने विजय मिळवला आहे. तर दिल्लीने प्ले ऑफमध्ये एकूण 6 सामने खेळले आहेत. या 6 पैकी केवळ 1 सामन्यातच दिल्ली विजय मिळवता आला.

साखळी फेरीतील कामगिरी

आयपीएलच्या यंदाच्या मोसमात दोन्ही संघ 2 वेळा आमनेसामने भिडले. या दोन्ही सामन्यात मुंबईने दिल्लीवर विजय मिळवला. मुंबईने पहिल्या सामन्यात 5 विकेट्सने तर दुसऱ्या सामन्यात 9 विकेट्सने दिल्लीचा पराभव केला.

मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), आदित्य तरे, अनमोलप्रीत सिंह, अनुकूल रॉय, ख्रिस लिन, धवल कुलकर्णी, दिग्विजय देशमुख, हार्दिक पंड्या, ईशान किशन, जेम्स पॅटिन्सन, जसप्रीत बुमराह, जयंत यादव, कायरन पोलार्ड, कृणाल पंड्या, मिचेल मॅक्लेनघन, मोहसिन खान, नॅथन कूल्टर-नाइल, प्रिंस बलवंत राय, क्विंटन डिकॉक, राहुल चाहर, सौरभ तिवारी, शेरफेन रदरफोर्ड, सूर्यकुमार यादव आणि ट्रेन्ट बोल्ट.

दिल्ली कॅपिटल्स : श्रेयस अय्यर (कर्णधार), कगिसो रबाडा, मार्कस स्टोयनिस, संदीप लामिछाने, अजिंक्य रहाणे, रवीचंद्रन अश्विन, शिखर धवन, शिमरॉन हेटमायर, अॅलेक्स केरी, मोहित शर्मा, पृथ्वी शॉ, ललित यादव, अवेश खान, अक्षर पटेल, तुषार देशपांडे, ऋषभ पंत, हर्षल पटेल, किमो पॉल, एनरिक नॉर्तजे, डॅनियल सॅम्स, तुषार देशपांडे आणि प्रवीण दुबे.

मागे

IPL 2020, SRH vs MI : संदीप शर्माची चमकदार कामगिरी, झहीर खानचा रेकॉर्ड मोडित
IPL 2020, SRH vs MI : संदीप शर्माची चमकदार कामगिरी, झहीर खानचा रेकॉर्ड मोडित

आयपीएलच्या 13 व्या (IPL 2020) मोसमातील साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात सनरायजर्स ....

अधिक वाचा

पुढे  

IPL 2020: विराट कोहलीने 'या' खेळाडूवर फोडले RCBच्या पराभवाचे खापर
IPL 2020: विराट कोहलीने 'या' खेळाडूवर फोडले RCBच्या पराभवाचे खापर

आयपीएलमधील एलिमिनेटर सामन्यात (Eliminator 2020) हैदराबाद सनराजर्स संघाकडून (Sunrisers Hyderabad) ....

Read more