By DAYANAND MOHITE | प्रकाशित: सप्टेंबर 18, 2020 01:51 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
आयपीएलच्या 13 व्या मोसमाचं बिगुल वाजलं आहे. 13 व्या मोसमातील सलामीचा सामना खेळण्यासाठी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज सज्ज आहेत. हा सामना 19 सप्टेंबरला खेळला जाणार आहे. मुंबईकडून कर्णधार रोहित शर्मा सलामीला उतरणार हे निश्चित आहे. मात्र त्याच्या जोडीला कोण असेल, याबाबतही आता मुंबईचा प्रशिक्षक महेला जयवर्धनेने स्पष्ट केलं आहे. दक्षिण आफ्रिकेचा विकेटकीपर फलंदाज क्विंटन डी कॉक हा रोहितसोबत सलामीला उतरेल, अशी माहिती जयवर्धनेने दिली. अबूधाबीतील पत्रकार परिषदेत जयवर्धनेने ही माहिती दिली. यावेळेस मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माही उपस्थित होता.
महेला जयवर्धने काय म्हणाला ?
“सलामीसाठी मुंबईकडे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. या अनेक पर्यांयापैकी ऑस्ट्रेलियाचा ख्रिस लिन हा सलामीवीर म्हणून चांगला पर्याय आहे. लिनकडून सलामीवीर म्हणून डावाची सुरुवात केली जाऊ शकते. मात्र मुंबईसाठी सलामीवीर म्हणून रोहित आणि डी कॉक यांनी आयपीएलच्या मागील मोसमात दमदार कामगिरी केली होती. दोघेही अनुभवी आहेत. दोघे फार वेळ एकत्र खेळलेत. दोघांमध्ये उत्तम ताळमेळ आहे. रोहित उत्तम कर्णधार ही आहे. ही जोडी एकमेकांना पूरक आहे. त्यामुळे या क्रमात कोणताही बदल न करता आहे तो क्रम कायम ठेवणार” असं जयवर्धने म्हणाला.
रोहित शर्मा काय म्हणाला ?
रोहितने याआधीही मुंबईसाठी विविध क्रमांवर फलंदाजी केली आहे. रोहित सलामीसह तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावरही खेळला आहे. “टॉप ऑर्डरमध्ये खेळताना मी मनसोक्त फटकेबाजी करत बॅटिंगचा आनंद घेतो. यंदाही मी फटकेबाजी करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे मी उत्सुक असल्याचं रोहित म्हणाला आहे. टीममध्ये परिस्थिती आणि गरजेनुसार अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मागील मोसमात सर्व सामन्यात मी सलामीला आलो. तसेच यावेळेसही सलामीला खेळण्याचा विश्वास रोहितने व्यक्त केला. परिस्थितीनुसार मी वेगळ्या क्रमांकावर येऊन फलंदाजी करेन, असंही रोहित म्हणाला. संघ व्यवस्थापन जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल. संघात दुसऱ्या सलामीवीराची भूमिका डी कॉक बजावेल आणि हे निश्चित असल्याचं रोहितने पत्रकार परिषदेत नमूद केलं.
रोहित आणि डी कॉक
रोहित आणि डी कॉक या दोघांनी मागील मोसमात 16 पैकी 15 सामन्यात डावाची सुरुवात केली. या दोघांनी 37 च्या सरासरीने 5 अर्धशतकांच्या सहाय्याने 565 धावा केल्या होत्या.
ईमध्ये आयोजन केलं आहे. एकूण 53 दिवस आयपीएलचा महासंग्राम चालणार आहे.या 53 दिवसांमध्ये एकूण 60 सामने खेळले जाणार आहेत. त्यापैकी 10 दिवस डबल हेडर (एका दिवशी दोन सामने) सामने खेळवण्यात येणार आहे. यूएईतील अबूधाबी, शारजाह आणि दुबई या मैदानात हे सामने खेळवण्यात येतील.
पेटीएमची सहयोगी कंपनी पेटीएम फर्स्ट गेम्सने (पीएफजी) मास्टरब्लास्टर सचिन त....
अधिक वाचा