By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 15, 2020 06:39 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
IPL 2020 या हंगामात आज किंग्ज इलेव्हन पंजाब विरूद्ध रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात सामना होत आहे. यूएईमधल्या शारजामध्ये ही लढत खेळवली जाणार आहे. याआधी 24 सप्टेंबर रोजी या दोन्ही टीम आमनेसामने आल्या होत्या. या मॅचमध्ये राहुलच्या नेतृत्वाखालील पंजाबने कोहलीच्या बंगळुरुचा 97 धावांनी दणदणीत पराभव केला होता. मात्र त्यानंतर झालेल्या 7 मॅचेसमध्ये पंजाबला विजय मिळवता आलेला नाही. याउलट कोहलीचा बंगळुरु संघ चांगल्या फॉर्ममध्ये आहे.
पंजाबने बंगळुरुला हरवल्यापासून आणखी एकाही मॅचमध्ये विजय संपादन केलेला नाही. तर विराट टीमने पाठीमागच्या 7 मॅचेसमध्ये 5 विजय मिळवले आहेत. आताच्या परिस्थितीत पंजाब टीम गुणतालिकेच्या तळाशी आहे तर बंगळुरु तिसऱ्या क्रमांकावर आहे.
रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरुपेक्षा आजच्या मॅचमध्ये पंजाबला विजयाची सर्वांत जास्त आवश्यकता आहे. दोन्ही टीमचा विचार केल्यास पंजाबच्या टीममध्ये असंतुलन असल्याचं दिसून येतं. पंजाबचा धडाकेबाज बॅट्समन ख्रिस गेल आज पुनरागमन करण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे विराट आणि एबी डिव्हीलियर्सच्या बॅटची जादू बघायला मिळाली तर पंजाबसाठी ती नक्कीच धोक्याची घंटा असणार आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु : विराट कोहली (कर्णधार), एबी डिव्हीलियर्स, पार्थिव पटेल, अॅरॉन फिंच, जोश फिलिप, ख्रिस मॉरिस, मोईन अली, मोहम्मद सिराज, शाहबाज अहमद, देवदत्त पडिक्कल, युजवेंद्र चहल, नवदीप सैनी, डेल स्टेन, पवन नेगी, शिवम दुबे, उमेश यादव, गुरकीरत सिंह मान, वॉशिंग्टन सुंदर, पवन देशपांडे आणि अॅडम झॅम्पा.
किंग्ज XI पंजाब – के.एल.राहुल (कर्णधार), ख्रिस गेल, मयांक अग्रवाल, सरफराज खान, मनदीप सिंग, अर्शदीप सिंग, दर्शन नलकंडे, हार्डस विल्जोन, हरप्रीत ब्रार, जगुद्देशा सुचित, करूण नायर, मोहम्मद शमी, निकोलस पुरम, शेल्डन कॉटरेल, ग्लेन मॅक्सवेल, जिमी निशम, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, कृष्णप्पा गौतम.ˀ
चेन्नई सुपर किंग्जसने (Chennai Super Kings) सनरायजर्स हैदराबादवर (Sunrisers Hyderabad) 20 धावांनी मात ....
अधिक वाचा