By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 14, 2020 09:53 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
चेन्नई सुपर किंग्जसने (Chennai Super Kings) सनरायजर्स हैदराबादवर (Sunrisers Hyderabad) 20 धावांनी मात केली आहे. चेन्नईने हैदराबादला विजयासाठी 168 धावांचे आव्हान दिले होते. मात्र हैदराबादला 20 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून 147 धावाच करता आल्या. हैदराबादकडून केन विलियम्सने सर्वाधिक 57 धावा केल्या. तर जॉन बेयरस्टोने 23 धावांची खेळी केली. या व्यतिरिक्त प्रियम गर्ग, विजय शंकर आणि रशिद खानने काही दुहेरी धावा केल्या. मात्र त्यांना हैदराबादला विजयी आकड्यापर्यंत पोहचवता आले नाही. चेन्नईकडून ड्वेन ब्राव्हो आणि कर्ण शर्माने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर सॅम करन, रवींद्र जडेजा आणि शार्दूल ठाकूर या तिकडीने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
त्याआधी चेन्नईने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. चेन्नईने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून 167 धावा केल्या. चेन्नईकडून शेन वॉटससने सर्वाधिक 42 धावा केल्या. तर त्या खालोखाल अंबाती रायुडूने 41 धावांची खेळी केली. हैदराबादकडून खलील अहमद, संदीप शर्मा आणि थंगारसु नटराजन या तिकडीने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोरनं कोलकाता नाईट रायडर्सचा 82 धावांनी ....
अधिक वाचा