By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 04, 2020 10:01 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
आयपीएलच्या 13 व्या (IPL 2020) मोसमातील साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) मुंबई इंडियन्सवर (Mumbai Indians) 10 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयासह हैदराबादने प्ले ऑफमध्ये धडक मारली आहे. कर्णधार डेव्हिड वॉर्नर, ऋद्धीमान साहा आणि संदीप शर्मा हे हैदराबादच्या विजयाचे शिल्पकार ठरले. डेव्हिड वॉर्नर आणि ऋद्धीमान साहा या सलामी जोडीने अनुक्रमे नाबाद 85 आणि 58 धावा केल्या. तर पहिल्या डावात बोलिंग करताना संदीप शर्माने हैदराबादकडून सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. संदीपने यासह विक्रमाला गवसणी घातली आहे.
काय आहे विक्रम?
संदीप शर्माने आपल्या स्पेलमधील 4 ओव्हरमध्ये 8.50 च्या इकॉनॉमी रेटने 34 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. संदीप शर्माने रोहित शर्मा, क्विंटन डी कॉक आणि इशान किशनला बाद केलं. संदीपने या 3 पैकी 2 विकेट्स पावर प्लेच्या पहिल्या 6 ओव्हरमध्ये घेतल्या. संदीपने क्विंटन डी कॉकला बाद करत पावर प्लेमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. संदीपने श्रीरामपूर एक्सप्रेस झहीर खानचा विक्रम मोडित काढला आहे. यासह संदीप शर्मा आयपीएलमधील पावर प्लेमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे.
पावर प्लेमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज
53 विकेट्स – संदीप शर्मा
52 विकेट्स – झहीर खान
48 विकेट्स – भुवनेश्वर कुमार
45 विकेट्स – उमेश यादव
44 विकेट्स- धवल कुलकर्णी
एलिमिनेटरमध्ये हैदराबाद विरुद्ध बंगळुरु
हैदराबाद विरुद्ध मुंबई यांच्यात साखळी फेरीतील शेवटचा सामना पार पडला. या सामन्यात हैदराबादने मुंबईवर विजय मिळवला. यामुळे प्ले ऑफचं चित्र स्पष्ट झालं आहे. हैदराबादने पॉइंट्सटेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. यामुळे प्ले ऑफमधील एलिमिनेटर सामना हैदराबाद विरुद्ध बंगळुरु यांच्यात खेळला जाणार आहे. हा सामना 6 नोव्हेंबरला अबुधाबीत संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी खेळला जाणार आहे.
आयपीएलच्या (IPL 2020) 13 व्या मोसमातील 55 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) रॉय....
अधिक वाचा