ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

IPL 2020: हैदराबादचा पंजाबवर 69 रनने विजय

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 09, 2020 10:08 AM 2019-02-12T14:15:30+5:30

IPL 2020: हैदराबादचा पंजाबवर 69 रनने विजय

शहर : मुंबई

आयपीएल सीजन 13 च्या 22 व्या सामन्यात हैदराबादने पंजाबला 69 रनने पराभव केला आहे. टॉस जिंकल्यानंतर आधी बॅटींग करण्याचा निर्णय हैदराबादसाठी योग्य ठरला. हैदराबादने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट गमवत 201 रन केले. 202 रनचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या पंजाबच्या टीमने 16.5 ओव्हरध्ये 132 रन केले. पंजाबची संपूर्ण टीम ऑलआऊट झाली. पंजाबकडून निकोलस पूरनने 77 रनची शानदार खेळी केली. दुसरा कोणताच बॅट्समन टिकू शकला नाही.

सनरायजर्स हैदराबादकडून जॉनी बेयरस्टोने 97 रनची तुफानी खेळी केली. डेविड वॉर्नरने आज 52 रन केले. वॉर्नर आणि बेयरस्टोने पहिल्या विकेटसाठी आज 160 रनची पार्टनरशिप केली. केन विलियमसनने 20 रन केले.

जॉनी बेयरस्टोने 10 व्या ओव्हरमध्ये आपलं अर्धशतक पूर्ण केलं. तर वॉर्नरने 14व्या ओव्हरमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. अब्दुल समद (8), मनीष पांडे (1) आणि प्रियम गर्ग (0) वर आऊट झाले. अभिषेक शर्माने 12 रन केले.किंग्स इलेवन पंजाबकडून लेग स्पिनर रवी बिश्नोईने 29 रन देत 3 विकेट घेतले. अर्शदीप सिंहने 33 रन देत 2 विकेट घेतले.

 

मागे

IPL 2020: मुंबईचा राजस्थानवर 57 रनने विजय
IPL 2020: मुंबईचा राजस्थानवर 57 रनने विजय

आयपीएल 2020 च्या 20 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सचा 57 रनने परा....

अधिक वाचा

पुढे  

IPL 2020: दिल्लीचा राजस्थानवर 46 रनने विजय
IPL 2020: दिल्लीचा राजस्थानवर 46 रनने विजय

आयपीएलच्या 23 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटलने राजस्थान रॉयल्सचा 46 धावांनी परा....

Read more