By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: सप्टेंबर 20, 2020 12:38 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
संयुक्त अरब अमिरात...म्हणजेच यूएई. मध्यपूर्वेतील याच संपन्न देशात पुढचे जवळपास दोन महिने यंदाच्या आयपीएलचा महासोहळा रंगणार आहे. खरंतर मुंबई : दरवर्षीप्रमाणे मार्च ते मेदरम्यान आयपीएल खेळवली जाणार होती. पण भारतात कोरोनाचा प्रभाव वाढला आणि ही स्पर्धा देशाबाहेर खेळवण्याच्या चर्चा सुरु झाल्या. पण अखेर कोरोनाचा कमीतकमी प्रभाव असलेल्या यूएईत आयपीएलच्या तेराव्या मोसमाचं आयोजन करण्याचं बीसीसीआयने पक्क केलं. भारतातील सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता जानेवारी महिन्यात होणाऱ्या भारत आणि इंग्लंड सीरीजचं आयोजन यूएईमध्ये होण्याची शक्यता आहे. एवढचं नाही तर पुढील वर्षाच्या आयपीएलचे देखील आयोजन यूएईमध्ये होण्याची शक्यता वाढली आहे.शनिवारी बीसीसीआय आणि संयुक्त अरब अमीरात क्रिकेट बोर्डामध्ये एक करार झाला. या करारामध्ये दोन्ही देशातील क्रिकेट बोर्डामध्ये दोन्ही देशातील संबंध मजबूत करण्याविषयी चर्चा झाली.
बीसीसीआयचे कोषाध्यक्ष अरुण धूमल एबीपी न्यूजला म्हणाले, सध्या बीसीसाआयने फक्त अमीरात क्रिकेट बोर्डासोबत यावर्षीच्या आयपीएलचा करार केला आहे. परंतु सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारत- इंग्लंज सीरीज आणि पुढील वर्षाची आयपीएल संयुक्त अरब अमीरात होण्याची शक्यता आहे. शनिवारी यूएई क्रिकेट बोर्डासोबत झालेल्या बैठकीत बीसीसीआयचे अध्यक्ष, सचिव, आणि कोषाध्यक्ष उपस्थित होते.
इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने यापूर्वीच बीसीसीआयला जानेवारीत होणाऱ्या सीरीजचे आयोजन यूएईमध्ये करण्याचे आवाहन केले आहे. एबीपी न्यूजला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सीरीजचे आयोजन यूएईमध्ये होण्याची शक्यता वाढली आहे.
भारतातील कोरोनाच्या प्रादुर्भावावर आयपीएलचे आयोजन अवलंबून आहे. जर पुढील वर्षी मार्च महिन्यापर्यंत कोरोनाची लस उपलब्ध नाही झाली तर आयपीएल 2021 चे आयोजन यूएईमध्ये होण्याची शक्यता जास्त आहे.
गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा पराभव करत महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर क....
अधिक वाचा