ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

"आयपीएलचा 14 वा मोसम स्थगित झाल्याने टीम इंडियाला फायदा"

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 25, 2021 01:36 PM 2019-02-12T14:15:30+5:30

शहर : मुंबई

"कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे आयपीएलचा 14 वा मोसम (IPL 2021) स्थगित करावा लागला. स्पर्धा लवकर स्थगित झाल्याने टीम इंडियाला (Team India) याचा फायदा होईल. वेळापत्रकानुसार आयपीएलच्या 14 व्या पर्वातील अंतिम सामना 30 मे ला खेळवण्यात येणार होता. ही स्पर्धा पूर्ण झाली असती तर, भारतीय खेळाडूंना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्याच्या (World Test Championship 2021) दृष्टीने सरावासाठी पुरेसा वेळ मिळाला नसता. मात्र स्पर्धा रद्द झाल्याने टीम इंडियाकडे सरावासाठी आवश्यक तितका कालावधी आहे. यामुळे टीम इंडियाच्या गोलंदाजांना सुधारणा करण्यासाठी वेळ मिळाला", अशी प्रतिक्रिया न्यूझीलंडचा (New Zealand) अनुभवी फलंदाज रॉस टेलरने (Ross Taylor) दिली आहे. टेलरने रविवारी पत्रकारांशी संवाद साधला यावेळेस तो बोलत होता. (ipl 2021 postponement is benefit for world test champiobship final 2021 team india, says new zealand senior player ross taylor)

आयपीएलच्या 14 व्या पर्वाचं आयोजन भारतात करण्यात आलं होतं. मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे 4 मे ला बीसीसीआयने स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

या मोसमात एकूण 60 सामने खेळवण्यात येणार होते. पण कोरोनामुळे केवळ 29 सामन्यांचेच यशस्वीरित्या आयोजन करता आले.

टेलर काय म्हणाला?

"टीम इंडियाच्या तुलनेत न्यूझीलंड नक्कीच चांगल्या स्थितीत असेल, कारण न्यूझीलंड इंग्लंडमध्ये त्यांच्याच विरोधात 2 कसोटी सामने खेळणार आहे. पण याचा आम्हाला थोडाफार फायदा होईल, कारण हा अंतिम सामना त्रयस्थ ठिकाणी खेळवण्यात येत आहे. टीम इंडिया सातत्याने आयसीसी कसोटी रॅकिंगमध्ये अव्वल क्रमांकावर आहे", असंही टेलरने नमूद केलं. 

टी 20 मुळे आंतरराष्ट्री क्रिकेट धोक्यात?

गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात टी 20 सामन्यांचे आयोजन करण्यात येत आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं भवितव्य धोक्यात आलंय का, असा सवाल टेलरला विचारण्यात आला. यावर टेलर म्हणला, " आयपीएल सर्वात मोठी टी 20 क्रिकेट स्पर्धा आहे. जेव्हा पर्यंत या सारख्या मोठ्या स्पर्धेचं आयोजन करण्याची तयारी इतर देश दाखवत नाहीत, तोवर सर्व क्रिकेट बोर्ड आयपीएलच्या वेळापत्रकानुसारच मालिकांचे आयोजन करतील. कारण आयपीएलमध्ये खेळण्यासाठी अनेक खेळाडू हे इच्छूक असतात. अजूनही आंतरराष्ट्रीय क्रिकेटला प्राथमिकता दिली जाते. त्यामुळे वनडे आणि एकदिवसीय क्रिकेटचं भवितव्य धोक्यात नाही", अशी प्रतिक्रिया टेलरने दिली

दरम्यान, टीम इंडिया साऊथ्म्पटनमध्ये 18-22 जून दरम्यान न्यूझीलंड विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना खेळणार आहे

मागे

अवघ्या 16 व्या वर्षी कसोटी क्रिकेटमध्ये डेब्यू, त्याच्या 428 धावांच्या जोरावर संघाचा 951 धावांचा पर्
अवघ्या 16 व्या वर्षी कसोटी क्रिकेटमध्ये डेब्यू, त्याच्या 428 धावांच्या जोरावर संघाचा 951 धावांचा पर्

वय केवळ 16 वर्ष 221 दिवस इतकं असताना कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण, प्रथम श्रेणी क....

अधिक वाचा

पुढे  

IPL 2021 :आयपीएलच्या उर्वरित सामन्यांचं आयोजन दुबईत, सप्टेंबरमध्ये होणार सुरुवात
IPL 2021 :आयपीएलच्या उर्वरित सामन्यांचं आयोजन दुबईत, सप्टेंबरमध्ये होणार सुरुवात

आयपीएलचा 14वा सीझन कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्याचा निर्णय घेण्य....

Read more