ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

''आयपीएल ही मजेशीर स्पर्धा आहे. येथे कोणीही कोणालाही हरवू शकतो''- रोहित शर्मा

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 06, 2019 11:13 AM 2019-02-12T14:15:30+5:30

''आयपीएल ही मजेशीर स्पर्धा आहे. येथे कोणीही कोणालाही हरवू शकतो''- रोहित शर्मा

शहर : मुंबई

आयपीएल 2019 : मुंबई इंडियन्सने इंडियन प्रीमिअर लीगमध्ये रविवारी कोलकाता नाईट रायडर्सवर 9 विकेट राखून विजय मिळवला. या विजयानंतर मुंबई इंडियन्सने गुणतालिकेत अव्वल स्थानासह क्वालिफायर 1 मध्ये स्थान पटकावले. मुंबई इंडियन्सला क्वालिफायर 1 मध्ये गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्सचा सामना करावा लागणार आहे. या सामन्यानंतर मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने एक भाष्य केले. तो म्हणाला, ''आयपीएल ही मजेशीर स्पर्धा आहे. येथे कोणीही कोणालाही हरवू शकतो.''

ख्रिस लीनने 29 चेंडूंत 41 धावा करताना कोलकाताला दमदार सुरुवात करून दिली. त्याने शुबमन गिलच्या सोबतीनं पहिल्या विकेटसाठी 49 धावा जोडल्या. पण, मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी कोलकाताला धक्के देण्याचे सत्र सुरु केले. लसिथ मलिंगाने कोलकाताचा हुकुमी एक्का आंद्रे रसेलला भोपळाही फोडू दिला नाही. त्याने कोलकाताचे तीन महत्त्वाचे फलंदाज बाद केले आणि त्यामुळे पाहुण्यांना 7 बाद 133 धावांपर्यंतच मजल मारता आली. रॉबीन उथप्पाने 47 चेंडूंत 40 धावा केल्या.''आयपीएल मजेशीर स्पर्धा आहे. कोणताही संघ कोणालाही नमवू शकतो आणि त्यासाठी आपल्याला काही महत्त्वाचे पाऊल उचलावे लागतात,'' असे रोहित म्हणाला. मुंबई इंडियन्सचा संघ पुनरागमन करण्यात तरबेज म्हणून ओळखला जातो. यापूर्वीच्या आयपीएलमध्ये पाहायला मिळालेले हेच चित्र यंदाही दिसले. निराशाजनक सुरुवातीनंतर मुंबई इंडियन्सने कमबॅक करताना गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. तो म्हणाला,''आयपीएल ही व्यावसायिक स्पर्धा आहे, हे सर्वांना माहित आहे. आम्ही नेहमीच दुसऱ्या टप्प्यात दमदार कामगिरी केलेली आहे. तो आमचा इतिहासच आहे. संघातील प्रत्येक खेळाडूने व्यावसायिक दृष्टीकोनातून खेळ केला आणि म्हणूनच आम्ही तीनही जेतेपद जिंकू शकलो.''

 

मागे

चेन्नई सुपर किंग्जची चांगली सुरुवात
चेन्नई सुपर किंग्जची चांगली सुरुवात

पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मोहालीच्या ब....

अधिक वाचा

पुढे  

भारत-पाक आयसीसी वर्ल्ड कप 2019  :  48 तासांत विकली गेली सामन्याची सर्व तिकिटं
भारत-पाक आयसीसी वर्ल्ड कप 2019 : 48 तासांत विकली गेली सामन्याची सर्व तिकिटं

आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारत आणि पाकिस्तान या शेजारील राष्ट्रांमध्ये नेहमीच तण....

Read more