By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 18, 2020 11:21 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर यंदा आयपीएलचे सामने भारताबाहेर युएईमध्ये घेण्याच्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात एका जनहित याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले आहे. आयपीएलचे सामने भारतातच घेण्याची मागणी या याचिकेतून केली गेली आहे.
पुण्यातील वकील अभिषेक लागू यांनी ही याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठापुढे होणार आहे. आयपीएल ही आंतरराष्ट्रीय पातळीवर नावजलेली एक मोठी स्पर्धा असल्यानं हे देशासाठी उत्पन्न मिळण्याचे महत्वपूर्ण साधन आहे. या दरम्यान देशातील अनेक उद्योगांना चालना मिळत असते. मागील वर्षी आयपीएलचं ब्रॅण्ड मूल्य हे 475 अब्ज कोटी इतकं होतं. यावरून याची व्याप्ती किती मोठी आहे याचा अंदाज येतो. म्हणूनच आयपीएल हे बीसीसीआयच्या उत्पन्नाचा एक प्रमुख स्त्रोत आहे. त्यामुळे संयुक्त अरब अमिरातीमध्ये हे सामने घेऊ नयेत, अशी मागणी याचिकेद्वारे केली आहे.
आयपीएलचे सामने यंदा मार्चमध्ये होणार होते. मात्र कोरोनाच्या साथीमुळे ते होऊ शकले नाहीत. तेव्हा आता सप्टेंबर 19 ते 10 नोव्हेंबर या दरम्यान दुबई, शारजाह, आणि अबूधाबी इथं भारत सरकारच्या परवानगीनं हे सामने घेण्याचं बीसीसीआयनं जाहीर केलं आहे.
आपल्या कारकीर्दीच्या समारोपासाठी अखेरचा सामना आयोजित करावा, अशी कोणतीही म....
अधिक वाचा