By NITIN MORE | प्रकाशित: जानेवारी 08, 2020 01:45 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबई - या वर्षीच्या आयपीएल टी-२० हंगामाची सुरुवात २९ मार्चला होणार असून स्पर्धेचा अंतिम सामना २४ मे रोजी होईल. म्हणजेच ही स्पर्धा सलग ५७ दिवस चालणार आहे. या हंगामात एका दिवशी एकच सामना होणार असून सायंकाळी ७:३० वाजता प्रत्येक सामना सुरू होईल.
या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, २९ मार्चला मुंबईत वानखेडे स्टेडीयमवर आयपीएलच्या सामन्याचा शुभारंभ होईल. ही स्पर्धा २९ मे ला संपणार आहे. तथापि या स्पर्धेचे पूर्ण शेड्यूल तयार केलेले नाही. या स्पर्धेला अधिकाधिक टी आरपी मिळावा, म्हणून प्रत्येक दिवशी सामना सायंकाळी ७:३० वाजता सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वीच्या हंगामात सामना रात्री उशिरा संपल्याचेही पाहायला मिळाले. परिणामी स्टेडीयममध्ये येऊन सामने पहाणार्या क्रिकेटप्रेमींना अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे यावेळी सामन्यांची वेळ निश्चित करण्यात आली आहे. मात्र सायंकाळी ७:३० वाजता क्रिकेट शौकीन मैदानात पोहचतील का ? यावरही चर्चा सुरू आहे.
पुणे - या वर्षी महाराष्ट्रची ६३ वी केसरी स्पर्धा पार पडली. या ....
अधिक वाचा