By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 20, 2019 05:03 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : विदेश
जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 भारताने हटविल्यापासून पाकिस्तानची आगपाखड सुरू आहे. पाकचे प्रमुख नेते आणि क्रिकेटपट्टू भारताशी युद्ध करण्याची भाषा करीत आहेत. त्यात आता माजी क्रिकेटपट्टू जावेद मियादादची भर पडली आहे. त्याने दर्पोक्ती करताना म्हटले आहे, "आमच्याकडील अणुबॉम्ब दाखविण्यासाठी नव्हे तर वापरण्यासाठी आहे. वेळ आली तर सर्व नष्ट करू शकतो."
Legendary batsman @ItsJavedMiandad speaks about ongoing issue of Kashmir and India.#Cricket #Pakistan #Karachi #Lahore #Kashmir #KashmirUnderThreat #KashmirHamaraHai #India #JavedMiandad pic.twitter.com/vdFZQ7EigV
— Khel Shel (@khelshel) August 18, 2019
पाकिस्तानातील क्रीडा वेबसाइट खेलशेल डॉट कॉमने इंस्टाग्राम अकाऊंट वर मियादादचा एक विडिओ शेअर केला आहे. त्यात जावेदने कश्मीर मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही त्याने टीका केली आहे. "मोदी सारखे लोक डरपोक आहेत. आमच्याकडील अणुबॉम्बचा वापर करून आम्ही सर्व नष्ट करू शकतो" अशी धमकी जावेदने दिली आहे.
यापूर्वी शाहीद आफ्रिदी, शोएब अख्तर, विद्यमान कर्णधार सर्फराज अहमद आदि क्रिकेटपट्टूनीही काश्मीर मुद्द्यावरून भारतावर टीका केली.
वेस्ट इंडिजमध्ये असलेल्या भारतीय क्रिकेट संघावर दहशतवादी हल्ला होण्याची ....
अधिक वाचा