By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 13, 2019 07:53 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचमध्ये शिखर धवनने शतक झळकावलं. या खेळीदरम्यान शिखर धवनच्या अंगठ्याला दुखापत झाली. त्यामुळे पुढचे काही दिवस तो खेळू शकणार नाही. शिखर धवनला पर्याय म्हणून ऋषभ पंतला इंग्लंडला पाठवण्यात आलं आहे. पण ऋषभ पंतची अंतिम १५ खेळाडूंमध्ये निवड करण्यात आली नाही. शिखर धवनच्या दुखापतीवर टीम इंडिया लक्ष ठेवून आहे. धवनची दुखापत लवकर बरी झाली नाही, तर ऋषभ पंतबद्दल निर्णय घेण्यात येईल.
शिखर धवनला पर्याय म्हणून ऋषभ पंतला इंग्लंडला पाठवण्यात आलं असलं तरी भारताचे माजी क्रिकेटपटू कपिल देव यांनी याबाबत वेगळं मत व्यक्त केलं आहे. शिखर धवनऐवजी अजिंक्य रहाणेचा विचार व्हायला हवा होता. कारण तो मधल्या फळीत आणि ओपनिंगलाही खेळू शकतो, असं कपिल देव म्हणाले.
'जर रहाणेच्या नावाचा विचार केला जात होता, तर शिखरला पर्याय म्हणून अजिंक्य रहाणेला पसंती द्यायला पाहिजे होती. रहाणेकडे वर्ल्ड कपसारख्या मोठ्या स्पर्धेत खेळण्याचा अनुभव आहे. तो मधल्या फळीप्रमाणेच ओपनिंगलाही बॅटिंग करू शकतो,' अशी प्रतिक्रिया कपिल देव यांनी दिली.
वर्ल्ड कपच्या भारत आणि न्यूझीलंड सामन्यामध्ये पावसाचा व्यत्यय आला आहे. पाव....
अधिक वाचा