By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 23, 2019 03:19 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
भारतीय क्रिकेटमध्ये विविध प्रीमिअर लीगचे आयोजन केले जाते. दरम्यान सध्या कर्नाटक प्रीमिअर लीग आणि तमिनाळनाडू प्रिमीअर लीग या स्पर्धांमध्ये स्पॉट फिक्सिंगचे सावट आहे. याआधी कर्नाटक प्रीमियर लीगमध्ये बेल्लारी टस्कर्सकडून खेळणाऱ्या दोन खेळाडूंवर मॅच फिक्सिंगमध्ये सहभाग असल्याचा आरोप होता. यामध्ये बेल्लारीचा कर्णधार सीएम गौतम आणि अबरार काझी यांचा समावेश आहे. 2019 च्या केपीएलमध्ये अंतिम सामन्यात स्पॉट फिक्सिंग झाल्याचं समोर आलं होतं.
दरम्यान, आता विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला मोठा दणका बसणार आहे. केपीएल लीगच्या स्पॉट फिक्सिंगची चौकशी करणाऱ्या क्राईम ब्रॅंचनं कर्नाटक जिल्हा क्रिकेट असोसिएशनला आयपीएलच्या गेल्या दोन हंगामात बंगळुरूमध्ये झालेल्या सर्व सामन्यांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी जे 18 प्रश्न विचारण्यात आले त्यावेळी आयपीएलचाही उल्लेख करण्यात आला होता. त्यामुळे कर्नाटक क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं आरसीबीचे होम ग्राऊंड असलेल्या बंगळुरूच्या चिन्नास्वामी मैदानावर झालेल्या सामन्यांची चौकशी करण्यात येणार आहे.
केपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी झालेल्या चौकशीत खेळाडू आणि प्रशिक्षकांच्या भुमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. या प्रकरणी सर्व खेळाडू आणि प्रशिक्षकांना नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यात बंगळुरूमध्ये आतापर्यंत झालेले सर्व सामने, स्कोअरबोर्ड, संपर्क विवरण आणि खेळाडूंची चौकशी करण्यात येणार आहे. यात आयपीएलच्या सामन्यांचाही समावेश आहे.
याबबात केएससीएचे प्रवक्ते विजय म्रुथंजया यांनी, “सीसीबीच्या वतीनं एक प्रश्नावली पाठवण्यात आली आहे. त्याबाबत आम्ही उत्तरे पाठवली आहेत. काही प्रश्न बाकी आहेत, त्यांची उत्तरे येत्या दोन दिवसात पाठवली जातील. त्यांसाठी आमची चौकशी सुरू आहे”, असे सांगितले.
विराटच्या संघातील खेळाडूला झाली अटक
सीएम गौतम कर्नाटककडून रणजी ट्रॉफी खेळला आहे. इतकंच काय तो आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूमध्ये 2011 आणि 2012 मध्ये होता. मात्र त्याला खेळण्याची संधी मिळाली नव्हती. त्यानंतर त्याला मुंबई आणि दिल्ली संघातही घेतलं होतं. तिथंही तो प्लेइंग इलेव्हनमध्ये नव्हता. तर काझी याआधी कर्नाटककडून तर सध्या मिझोरामकडून खेळतो. याआधीही काहींना याप्रकरणात अटक झाली आहे.
बेंगळुरू ब्लास्टर्सचे बॅटिंग कोच वीनू प्रसाद, सेलिब्रिटी ड्रमर भावेश बाफना यांनाही ताब्यात घेतलं आहे. भावेश बाफनाने एका खेळाडूला एका षटकात 10 धावा देण्यासाठी आमिष दिलं होतं.पॉट फिक्सिंग प्रकरणी अटक केलेला निशांत सिंग शेखावत संघातील सदस्य आणि बुकींच्या संपर्कात होता. निशांत विश्वनाथन आणि वीनू प्रसाद यांच्याशी बोलत असे. या मॅच फिक्सिंगमुळे केपीएलच्या प्रतिमेला धक्का बसला आहे. कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनने केपीएल 2009 मध्ये सुरू केली होती. आयपीएलच्या धर्तीवर कर्नाटकमधील खेळाडूंसाठी ही लीग सुरू करण्यात आली होती. केपीएलशिवाय तामिळनाडु प्रीमियर लीगमध्येही मॅच फिक्सिंग स्कँडल समोर आलं आहे.
येत्या 6 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या भारत - वेस्ट इंडीज सीरिजसाठी भारताची टी....
अधिक वाचा