By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 29, 2019 12:39 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
दुसऱ्या सराव सामन्यात धोनी आणि केएल राहुलने धमाकेदार शतक ठोकलं आहे. या दोनही खेळाडुंच्या शतकाच्या जोरावर भारताने बांगलादेश पुढे 360 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. भारताकडून शिखर धवन आणि रोहित शर्माने इनिंगची सुरुवात केली. पण २ बॉल पडताच पावसाला सुरुवात झाली. पाऊस थांबल्यानंतर पुन्हा खेळ सुरु झाला. भारताने 50 ओव्हरमध्ये ७ विकेट गमवत 359 रन केले.धोनीने 73 बॉलमध्ये शतक ठोकलं. ज्यामध्ये 6 सिक्स आणि 8 फोरचा समावेश आहे. धोनीने 78 बॉलमध्ये 113 रन केले. भारताची सुरुवात खराब झाली. शिखर धवन एक रनवर तर रोहित शर्मा 19 रनवर आऊट झाले. 19 व्या ओव्हरमध्ये मोहम्मद सैफुद्दीनने कर्णधार विराट कोहलीला आऊट केलं. विराटने 47 रन केले.
कोहलीच्या विकेटनंतर विजय शंकर देखील फक्त 2 रनवर आऊट झाला. त्यानंतर आलेल्या केएल राहुलने शानदार शतक ठोकलं. 44 व्या ओव्हरमध्ये 108 रनवर तो आऊट झाला. केएल राहुलनंतर आलेल्या हार्दिक पंड्याने 11 बॉलमध्ये 21 रन केले. बांगलादेशने टॉस जिंकत बॉलिंग करण्याचा निर्णय़ घेतला. पहिल्या सराव सामन्यात न्यूझीलंडने भारताचा पराभव केला होता. ६ विकेटने भारताचा पराभव झाला होता.
भारताच्या अपूर्वी चंदेला हिने सोनेरी लय कायम ठेवताना जर्मनीच्या म्युनिच य....
अधिक वाचा