ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

K L Rahul l के एल राहुलचं वादळ, 69 चेंडूत 132 धावा, 3 मोठे विक्रम

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: सप्टेंबर 25, 2020 07:57 AM 2019-02-12T14:15:30+5:30

K L Rahul l के एल राहुलचं वादळ, 69 चेंडूत 132 धावा, 3 मोठे विक्रम

शहर : मुंबई

किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार के एल राहुलने (KL Rahul) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Banglore) विरुद्ध धुवांधार फलंदाजी करत 69 चेंडूत 132 धावांची शतकी खेळी केली. या वादळी खेळीद्वारे राहुलने आयपीएलमधील 3 विक्रम त्याच्या नावावर केले. राहुलच्या खेळीच्या जोरावर पंजाबच्या संघाने 3 बाद 206 धावा केल्या.

राहुलने 132 धावांच्या वादळी खेळीत 7 षटकार आणि 14 चौकार लगावले. राहुलने त्याचे शतक षटकार खेचत पूर्ण केले. IPL मध्ये राहुलचे हे दुसरे शतक ठरले. पंजाबकडून शतकी कामगिरी करणारा के एल राहुल सामनावीर ठरला.

राहुलने त्याच्या नावावर केलेले 3 विक्रम

IPL मध्ये भारतीय खेळाडूने एका डावात सर्वाधिक 132 धावा करण्याचा विक्रम राहुलने केला. यापूर्वी हा विक्रम रिषभ पंत याच्या नावावर होता. 2018 च्या मोसमात त्याने 128 धावा केल्या होत्या. आयपीएलमधील एखाद्या संघाचा कर्णधार म्हणून एका डावात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही राहुलने केला.

राहुलने आयपीएलमधील 60 व्या सामन्यात 2000 धावसंख्येचा टप्पा ओलांडला. सचिन तेंडूलकरने 2 हजार धावा 63 सामन्यांमध्ये केल्या होत्या. संपूर्ण आयपीएलचा विचार केल्यास ख्रिस गेलने 48 सामन्यात तर शॉन मार्शने 52 सामन्यात 2 हजार धावा केल्या आहेत.दरम्यान, पंजाबने बंगळुरुला विजयासाठी 207 धावांचे तगडे आव्हान दिले होते. मात्र बंगळुरुला अवघ्या 109 धावाच करत्या आल्या. बंगळुरुचा संपूर्ण संघ 17 ओव्हरमध्येच ऑल आऊट झाला.किंग्ज इलेव्हन पंजाबने ( Kings XI Punjab ) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर ( Royal Challengers Bangalore ) 97 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे.

सामन्यानंतर  पंजाबचा संघ आयपीएलच्या गुणतालिकेत प्रथम क्रमांकावर पोहोचला आहे. पंजाबकडून रवि बिश्नोई आणि मुर्गन आश्विन या दोघांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तर शेल्डॉन कॉट्रेलने 2 विकेट्स घेतल्या.

 

मागे

IPL 2020 : राजस्थानची 'रॉयल' सुरुवात, चेन्नईवर 16 धावांनी मात
IPL 2020 : राजस्थानची 'रॉयल' सुरुवात, चेन्नईवर 16 धावांनी मात

राजस्थान रॉयल्सने  आयपीएलच्या 13 व्या (IPL 2020) मोसमाची विजयी सुरुवात केली आहे. ....

अधिक वाचा

पुढे  

अवघ्या 22 वर्षांचा इशान, 58 चेंडूत 99 धावा ठोकून 'विराट' सेनेचा घाम फोडला
अवघ्या 22 वर्षांचा इशान, 58 चेंडूत 99 धावा ठोकून 'विराट' सेनेचा घाम फोडला

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा फलंदाज इशान ....

Read more