By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 05, 2020 01:38 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जसने (Chennai Super Kings) काल (रविवारी) रात्री झालेल्या सामन्यात के. एल. राहुलच्या किंग्ज इलेव्हन पंजाबचा (Kings Eleven Punjab) 10 विकेट्सने दणदणीत पराभव केला आहे. पंजाबने विजयासाठी दिलेल्या 179 धावांचे आव्हान चेन्नईने एकही विकेट न गमावता पूर्ण केले. शेन वॉटसन (Shane Watson) आणि फॅफ डु प्लेसिस (Faf du Plessis) या सलामीच्या जोडीने चेन्नईला विजय मिळवून दिला. या जोडीने पंजाबच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत अवघ्या 106 चेंडूत नाबाद 181 धावांची धमाकेदार सलामी भागीदारी केली.
शेन वॉटसनने 53 चेंडूत नाबाद 83 धावा केल्या. या खेळीत त्याने 11 चौकार आणि 3 षटकार ठोकले. तर दुसऱ्या बाजूला फॅफ डु प्लेसिसनेही नाबाद 87 धावा केल्या. त्याने या खेळीत 11 चौकार आणि षटकार लगावला. पंजाबच्या एकाही गोलंदाजाला चेन्नईची एकही विकेट मिळवता आली नाही. यादरम्यान या दोन फलंदाजांनी आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी भागीदारी रचली.यापूर्वी चेन्नईच्याच मुरली विजय आणि माईक हस्सी या दोघांनी रॉयल चॅलेंजर्स बँगलोरविरुद्ध 28 मे 2011 रोजी खेळवण्यात आलेल्या सामन्यात पहिल्या विकेटसाठी 159 धावांची भागीदार केली होती.
आयपीएल इतिहासातील दुसरा सर्वात मोठा विजय
चेन्नईच्या संघाने लागोपाठी तीन सामने गमावले होते. त्यानंतर कालच्या सामन्यात चेन्नईने पराभवांची मालिका खंडित केली. यावेळी चेन्नईने 10 विकेट आणि 14 चेंडू राखून सामना एकहाती जिंकला. आयपीएलच्या इतिहासातील हा दुसरा सर्वात मोठा विजय ठरला आहे.
दरम्यान आयपीएलमध्ये आतापर्यंत 12 वेळा एखाद्या संघांने दुसऱ्या संघाला 10 विकेट राखून पराभूत केले आहे. चेन्नईच्या संघाने याआधी 10 एप्रिल 2013 रोजी झालेल्या सामन्यात पंजाबवर 10 विकेट राखून विजय मिळवला होता.
आयपीएलच्या IPL 2020 यंदाच्या हंगामातील आणखी एक सामना शारजाह येथील स्टेडियममध्य....
अधिक वाचा