By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 10, 2019 12:45 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : chennai
काल चेन्नई येथे झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने केेकेआरचा दारूण पराभव केला आहे. आजच्या सामन्यात सीएसकेने केकेआरचा 7 विकेटने पराभव करत तो पुन्हा हिसकावून घेतला. सीएसकेने केकेआरला फक्त 108 धावात रोखले. त्यानंतर हे टार्गेट 17.2 षटकात तीन फलंदाजांच्या मोबदल्यात ते आरामात पार केले. आंद्रे रसेलच्या अर्धशतकी खेळीमुळे केकेआरला आपली शंभरी गाठता आली.
केकेआरने ठेवलेल्या 108 धावांचे माफक आव्हान पार करताना सीएसकेचीही सुरुवात खराब झाली. वॉट्सनने आल्या आल्या आक्रमक खेळण्यास सुरुवात केली आणि 1 षटकार व 2 चौकार मारल्यानंतर तो नारायणच्या गोलंदाजीवर बळी झाला. त्यानंतर सुरेश रैनाही मोठे शॉट खेळण्याचे बरेच प्रयत्न केल्यानंतर 14 धावांवर बाद झाला. रैना बाद झाल्यानंतर आलेल्या रायडू आणि फाफ ड्युप्लिसिसने मोठे शॉट मारण्याच्या मोह टाळत एकेरी आणि दुहेरी धावा करण्यावर भर दिला. या दोघांनी तिसर्या विकेटसाठी 46 धावांची महत्वपूर्ण भागिदारी रचली.
सीएसकेला विजयासाठी 28 धावांची गरज असताना रायडूने मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न केला पण, हा प्रयत्न फसला आणि तो चावलाच्या गोलंदाजीवर राणाकडे झेल देत परतला. त्याने 31 चेंडूत 21 धावांची खेळी केली. दुसरीकडे ड्युप्लिसिसने संयमी खेळी करत सीएसकेला पाचवा विजय मिळवून दिला. त्याने 45 चेंडूत नाबाद 43 धावा केल्या.
तत्पूर्वी, चेन्नई विरुद्धच्या आजच्या सामन्यात केकेआरच्या संघात फक्त एकच फलंदाज बॅट घेवून आला होता तो म्हणजे आंद्रे रसेल. हरभजनच्या कृपेमुळे रसेलला आपली मसल पॉवर दाखवण्याची संधी मिळाली. पण, सीएसकेच्या फिरकीपुढे त्या रसेलच्या मसलमधली पॉवरची तीव्रता फार जाणवली नाही. त्याने केलेल्या 44 चेंडूत 50 धावांच्या जीवावर केकेआरने शंभरी गाठत सीएसके समोर 108 धावांचे आव्हान ठेवले.
नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करत केकेआरच्या फलंदाजीचे कंबरडेच मोडले. पहिल्याच षटकात दिपक चहरने धोकादायक ख्रिस लेनला शून्यावर बाद केले. फिरकीला साथ देणार्या खेळपट्टीवर धोनीने दुसरेच षटक टाकण्यासाठी हरभजनकडे बॉल सोपवला. त्यानेही सुनिल नारायणला 6 धावांवर पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
हरभजनचा चेंडू इतका टर्न होता होता की आता धोनी दुसर्या बाजूनेही स्पिनर काढणार असे वाटत होते. पण, धोनीने चहरवर विश्वास टाकला. त्यानेही नितीश राणाला भोपळाही फोडू दिला नाही. त्यामुळे पहिल्या तीन षटकात केकेआरचे तीन फलंदाज तंबूत होते आणि स्कोअरबोर्डवर फक्त 9 धावा लागल्या होत्या. केकेआरने चौथे षटक कसेबसे विकेट न देता घालवले. पण, आज भलत्याच रंगात आलेल्या दिपक चहरने पाचव्या षटकात रॉबिन उथप्पाला बाद करत आपली तिसरी शिकार केली. त्यानंतर कर्णधार दिनेश कार्तिक आणि शुमन गिलने केकेआरचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण, ताहीरने त्या दोघांनाही पाठोपाठ बाद करत केकेआरची अवस्था 10 षटकात 6 बाद 47 अशी दयनीय केली.
पण, हरभजनने दिलेल्या जीवनदानाची सीएसकेला चांगलीच किंमत मोजायला लावली ती आंद्रे रसेलने. ताहीरच्या गोलंदाजीवर हरभजनने झेल सोडल्यानंतर रसेलने केकेआरला एकट्याच्या जीवावर शंभरी पार करुन दिली. त्याने 44 चेंडूत 50 धावा केल्या. त्यात 3 षटकात आणि 5 चौकारांचा समावेश होता. जरी रसेलने आधीच्या सामन्याप्रमाणे तडाखेबाज खेळी केली नसली तरी संघाने केलेल्या धावांपैकी निम्या धावा रसेलने एकट्यानेच केल्या. त्याच्यामुळेच केकेआरने 108 धावांपर्यंत मजल मारली.
सीएसकेने प्रथम नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यामुळे केकेआ....
अधिक वाचा