By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 11, 2019 06:40 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
विश्वचषकात उपान्त्य फेरीत न्यूझीलंडने टिम इंडियाचा 18 धावांनी पराभव केला. त्यामुळे या स्पर्धेतील भारताचं आव्हान संपुष्टात आल. उपान्त्य फेरीचा सामन्यात आघाडीच्या फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. त्यानंतर आलेल्या धोंनीनेही संथ गतीने खेळी केली. त्यामुळे धोनीने आता निवृत व्हावं , अशी चर्चा सोशल मीडियावर जोर धरू लागली आहे.मात्र धोनीच्या समर्थनार्थ जेष्ठ गायोका लता मंगेशकर उभ्या राहिल्या आहेत. लता दिदिनी धोनीला उद्देशून भावनिक ट्वीट करून त्याचा बचाव केला. " नमस्कार एम एस धोनीजी , माझ्या अस कानावर आल आहे की, तुम्ही निवृतीचा विचार करीत आहात. कृपया तुम्ही असा विचार करू नका. देशाला तुमच्या खेळाची गरज आहे. माझी तुम्हाला विनती आहे, निवृतीचा विचार तुम्ही मनातही आणू नका. " अस भावनिक ट्वीट लता दिदिनी धोणीसाठी केल आहे.
इटलीमध्ये सुरू असलेल्या ' समर वर्ल्ड यूनिवर्सिटी स्पर्धेत ' भारताची आघाड....
अधिक वाचा