By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 25, 2019 12:08 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
नवी दिल्ली - राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती, सेलिब्रिटी कुस्तीपटू गीता फोगट आई झाली. गीता फोगटने एका गोंडस मुलाला जन्म दिला. गीताने पती आणि बाळासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत ही गोड बातमी सांगितली आहे.
आई झाल्याची ‘गुड न्यूज’ शेअर करताना गीताने इन्स्टाग्रामवर छान कॅप्शनही दिलं आहे. ‘बाळा, तुझं या जगात स्वागत आहे. आम्ही किती प्रेमात आहोत. कृपया याला तुमचं प्रेम आणि आशीर्वाद द्या. त्याने आमचं आयुष्य आता परिपूर्ण केलं आहे. आपल्या मुलाला जन्म देताना पाहण्याचा अनुभव शब्दात वर्णन करण्यापलिकडचा आहे’ अशा शब्दात गीताने ही बातमी दिली आहे.
गीता-बबिता जोडगोळीतील तिची बहीण आणि ‘दंगल गर्ल’ बबिता फोगट हिनेही आपल्या भाच्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या आहेत. ‘आई झाल्याबद्दल तुझं अभिनंदन. मी आशा करते बाळाला आनंद, प्रेम आणि हास्याने परिपूर्ण दीर्घायुष्य प्राप्त होऊ दे. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर त्याला प्रेम, यश आणि आनंद मिळो. तू आपली परंपरा बाळामध्ये उतरवली आहेस’ असं बबिताने ट्विटरवर लिहिलं आहे.
Congratulations, sister, on your newborn baby. I wish your new bundle of joy a long life full of happiness, fun, laughter and love. May he meet with love, success and happiness in each and every step he takes in life. You just penned down your new legacy with this beautiful baby pic.twitter.com/MTzwcHzg6L
— Babita Phogat (@BabitaPhogat) December 24, 2019
गीता फोगट हिने 20 नोव्हेंबर 2016 रोजी कुस्तीपटू पवन कुमारशी लग्न केलं होतं. 2010 मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी गीता फोगाट ही भारताची पहिली महिला कुस्तीपटू ठरली होती. मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा ब्लॉकबस्टर सिनेमा ‘दंगल’ हा गीता फोगट आणि तिची बहिण बबिता फोगट यांच्या जीवनावर आधारित होता. गीता फोगटने ‘खतरों के खिलाडी’ या रिअॅलिटी शोमध्येही भाग घेतला होता.
मेलबर्न - टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्या शि....
अधिक वाचा