By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 23, 2019 01:38 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : विदेश
श्रीलंकेचा यॉर्कर बादशाह म्हणून प्रसिद्धी अनुभवी गोलंदाज लसीथ मलिंगाने एकदिवसीय क्रिकेट मधून निवृतीची घोषणा केली आहे. बांगलादेश विरूद्ध पहिला वन-डे सामना खेळून मलिंगा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला गुड बाय करणार आहे. श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात 3 सामन्याच्या वन-डे मालिकेला 26 जुलै पासून सुरुवात होत आहे.
लसीथ मलिंगाने 225 वन-डे मध्ये 335 विकेट्स घेतल्या आहेत. श्रीलंकेकडून सर्वाधिक विकेट घेणार्यांमध्ये मुथय्या मुरलीधरन (534) आणि चामुंडा वास (400) यांचा समावेश आहे. त्यानंतर तिसरा क्रमांक मलिंगाचा लागतो. मलिंगाने 2011 मध्येच कसोटीतून निवृती घेतली आहे.
लोकशाही पद्धतीने नी:पक्ष निवडणूक न झाल्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदे....
अधिक वाचा